Vasai Congress News : वसई तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाची राम पाटील यांची हॅट्रिक

Congress Ram Patil News : राजकीय परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो त्यांची पक्षनिष्ठा कायम...
Vasai Congress News
Vasai Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

संदीप पंडित

Virar : वसई तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राम पाटील यांनी अध्यक्षपदाची हॅटट्रिक साधली आहे. त्यांची सलग तिसर्‍या वेळेस वसई तालुका ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन व प्रशासन विभागाचे सरचिटणीस प्रमोर मोरे व पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी राम पाटील यांच्या नियुक्तीचं पत्र दिलं आहे.

महाराष्ट्र प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या मान्यतेने व प्रदेश काँग्रेस(Congress)चे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्या आदेशानुसार पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या वसई ग्रामीण ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राम पाटील यांची नियुक्ती करण्यात येत आहे. ते निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते असून राजकीय परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो त्यांची पक्षनिष्ठा कायम राहिली आहे. सोयीसाठी पक्षबदल त्यांनी केलेला नाही.

Vasai Congress News
Vaisai Virar Political News : काँग्रेस आणि भाजपचं राष्ट्रवादीच्या पावलांवर पाऊल; वसईमध्ये अध्यक्षपदाची भाकरी फिरवणार

मागील वर्षी झालेल्या वसई पंचायत समितीच्या तिल्हेर गण पोटनिवडणुकीत राम पाटील यांच्या पुढाकारामुळे काँग्रेस उमेदवाराने बाराशे मतांचा टप्पा ओलांडला होता. बहुजन विकास आघाडीने कडवं आव्हानं उभं करूनही राम पाटील यांनी काँग्रेससाठी चमकदार कामगिरी केली होती.

पाटील यांच्या नेतृत्वात पारोळ ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आली होती. सद्यस्थितीतही पारोळ ग्रामपंचायतीत काँग्रेसचे तीन सदस्य आहेत. वसई(Vasai Virar) तालुका ग्रामीण क्षेत्र वसई-विरार शहर महापालिका जिल्हाक्षेत्राशी संलग्न करावं असा काहींचा आग्रह होता. मात्र, असं करणं पक्षाच्या घटनेशी सुसंगत नसल्याने प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी वसई तालुका ग्रामीण काँग्रेस क्षेत्र पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत कायम ठेवलं आहे.

Vasai Congress News
Alandi Warkari Viral Video: आम्हाला एकांतात नेऊन मारलं ? ; वारकऱ्यांचा गंभीर आरोप ; आळंदीत नेमकं काय घडलं ; Video व्हायरल..

राम पाटील काय म्हणाले ?

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्‍यांना सोबत घेवून पक्षाची संख्यात्मक व गुणात्मक वाढ करण्यासाठी आगामी काळात कसोशीने प्रयत्न केले जातील असं राम पाटील यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com