Ramdas Athawale News: फडणवीसांच्या कुठल्या आश्वासनानं आठवलेंनी सोडलं शिर्डीवर पाणी?

Shirdi Lok Sabha Constituency 2024: एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी खासदार होते, त्यामुळे प्रयत्न करूनही ती जागा सोडली नाही," असे आठवले म्हणाले.
Ramdas Athawale News
Ramdas Athawale NewsSarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Election 2024) इच्छुक होते, पण ही जागा शिवसेना शिंदे गटाने स्वतःकडे खेचल्याने रामदास आठवले (Ramdas Athawale) नाराज होते. आरपीआयने सुरुवातीपासून 'शिर्डी'वर दावा केला होता. याबाबत आठवले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या बदल्यात मला आश्वासन दिले आहे. ते आश्वासन पाळतील, अशी आशा आहे. त्यामुळे आता मी नाराज नसून ती जागा सोडली असल्याचे आठवले यांनी सांगितले. "शिर्डीतून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहण्याची माझी इच्छा होती. उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मी प्रयत्न केले. पण, एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना अडचण होती," असे मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते डोंबिवलीत बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आठवले नाराज असल्याची चर्चा होती. "शिर्डीतून निवडणूक लढविण्याची माझी इच्छा होती. 2009 मध्ये माझा पराभव झाला होता. एखादी जागा मिळावी, असा आमचा आग्रह होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची अडचण होती. देवेंद्र फडणीस यांनीही आग्रह केला होता. त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी खासदार होते. त्यामुळे प्रयत्न करूनही ती जागा सोडली नाही," असे आठवले म्हणाले.

Ramdas Athawale News
Lok Sabha Election 2024: मतदानाला दांडी मारण्याचा प्लॅन चिमुरड्याने हाणून पाडला; आई-बाबांना ताब्यात घ्या! पोलिसांना पत्र

"आता देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ला माझी राज्यसभा संपते, त्यांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रिपद आहे, आता कॅबिनेट मंत्री पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर विस्तार झाले की मंत्रिपद आणि एमएलसी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. महामंडळात चेअरमन व दोन वेगवेगळी पदं यामध्ये आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल. याबाबत आमचं बोलणं झाले आहे. त्यामुळे आता नाराजी दूर झाली आहे," असे आठवले यांनी नमूद केले.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com