Hingoli News: मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवडणूक आयोगाने (Election Commission) केले आहे. त्यानंतरही अनेक जण मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या सुटीचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळे प्लॅन आखत असतात, असाच प्लॅन आखत असलेल्या एका दाम्पत्याच्या विरोधात त्यांच्याच मुलाने पोलिसांकडे तक्रार करून त्यांचा प्लॅन हाणून पाडला. याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हिंगोलीत हा प्रकार घडला आहे. येथील एका चिमुरड्याने चक्क पोलिसकाकांना पत्र लिहिले. "मतदानाला (Lok Sabha Election 2024) दांडी मारण्याचा विचार करणाऱ्या आई वडिलांना ताब्यात घ्या," अशी तक्रार पत्राद्वारे त्याने केली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी गावाला जाण्याऱ्या आई-बाबांचा बेत त्याने हाणून पाडला.
हिंगोलीत एका कुटुंबाने मतदानाच्या दिवशी दांडी मारून देवदर्शनाला जाण्याचा बेत आखला होता. मात्र, आई-वडिलांचे संभाषण ऐकून एका चिमुकल्याने थेट पोलिसांनाच पत्र लिहिले आहे. एखाद्या चित्रपटात घडावी, अशी घटना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावामध्ये घडली आहे. या गावातील चिमुकल्याने गोरेगाव पोलिसांना खरमरीत पत्र लिहून लोकशाहीच्या उत्सवाला दांडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांनाच धडा शिकवला.
हा चिमुकला हे पत्र घेऊन जेव्हा गोरेगाव पोलिसांमध्ये पोहोचला, तेव्हा त्याने लिहिलेले पत्र पाहून गोरेगाव पोलिसही भारावून गेले आहेत. गोरेगावचे सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी चिमुकल्याची समजूत काढत त्याच्या आई-वडिलांनादेखील समज दिली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.