Ramdas Athwale : एनडीए जिंकूनही रामदास आठवलेंचा एक्झिट पोलवर भरोसा नाय...

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : काँग्रेसकडे 70 वर्षे लोकमत होते, आता दहा वर्षांत मोदींनी त्यांना धक्का दिला आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली. त्यामुळे आता फक्त 4 जूनची वाट पाहायची आहे.
Ramdas Athwale
Ramdas AthwaleSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच एक्झिट पोलच्या आकड्यांनी धुमाकूळ घातला आहे. सर्व एजन्सींच्या पोलनुसार देशात एनडीएला 350 हून अधिक जागा मिळतात. तर राज्यात फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. पोलच्या या आकड्यांवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आक्षेप घेतला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महायुती चारसौ पार होणार असून राज्यातही 35 हून अधिका जागा जिंकण्याचा दावा आठवलेंनी केला आहे.

रामदास आठवले Ramdas Athwale म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या विकासकामांचे गारुड देशावर आहे. त्यामुळे 543 पैकी महायुतीला 400 हून अधिक जागा मिळणार आहेत. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चांगले काम झाले आहे. त्यामुळे आम्हाला 35 हून अधिक जागा मिळतील. सर्व पोलनुसार अजितदादांना एक जागा दिसत आहे. ती जागा बारामतीचीच असेल, असे आठवलेंनी ठासून सांगत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी Narendra Modi 400 पारचा नारा दिला होता. त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडत आम्ही लोकांना सामोरे गेलो होतो. काँग्रेसकडे 70 वर्षे लोकमत होते, आता दहा वर्षांत मोदींनी त्यांना धक्का दिला आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली. त्यामुळे आता फक्त 4 जूनची वाट पाहायची आहे. इंडिया आघाडीवाले सत्तेचा दावा करत असतील तर तोच अधिकार आम्हालाही आहे, असेही आठवलेंनी सांगितले.

Ramdas Athwale
Hyderabad : आंध्र प्रदेश आता राजधानीविना; हैदराबादनंतर कोणत्या शहराला पसंती?

लोकसभा निवडणुकीत शिर्डीसाठी आम्ही आग्रह धरला होता. मात्र त्याऐवजी आमचा सत्तेचा वाटा देण्याची जबाबदारी भाजपची आहे. कॅबिनेट देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले आहे. राज्याच्या कॅबिनेटमध्ये देखील आम्हाला वाटा मिळेल. तसेच विधान परिषदेचेही जागा देण्याचे कबूल केले आहे. विधानसभेत 8 ते10 जागा आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा आहे, असा दावाही आठवलेंनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ramdas Athwale
Pune police officer video viral : पोलिस अधिकाऱ्याने तरुणाकडून चक्क दाबून घेतले पाय; व्हिडिओ व्हायरल !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com