Pune police officer video viral : पोलिस अधिकाऱ्याने तरुणाकडून चक्क दाबून घेतले पाय; व्हिडिओ व्हायरल !

Pune Crime News : कोरेगाव पार्क, पुणे कॅम्प, विमाननगर या भागासह कल्याणीनगर, एमजी रोड या भागात शनिवारी, रविवारी तरुणाईची मोठी गर्दी होत असते. पार्टी करून मोठ्या प्रमाणात युवक आणि युवती या भागातून ये-जा करत असतात. त्यामुळे आता पोलिसांनी या भागात आपले लक्ष केंद्रीत केले आहे..
police officer video
police officer videoSarkarnama

Pune News : कल्याणीनगर भागात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये ताब्यात घेतलेल्या एका तरुणाकडून पोलिस अधिकाऱ्याने पाय दाबून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस दलात जोरदार खळबळ उडाली आहे. या घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून वाहतूक विभागातील संबधित पोलिस अधिकाऱ्याची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मे ला मध्यरात्री भरधाव वेगाने चाललेल्या पोर्श कारने एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या एक युवक-युवतीचा जागेवरच मृत्यू झाला. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा ही कार चालवित होता. दारु पिऊन हा मुलगा गाडी चालवित असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आहे. या घटनेनंतर पुणे पोलिस अलर्ट मोडवर आले असून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जात आहे.

कोरेगाव पार्क, पुणे कॅम्प, विमाननगर या भागासह कल्याणीनगर, एमजी रोड या भागात शनिवारी, रविवारी तरुणाईची मोठी गर्दी होत असते. पार्टी करून मोठ्या प्रमाणात युवक आणि युवती या भागातून ये-जा करत असतात. त्यामुळे आता पोलिसांनी (Police) या भागात आपले लक्ष केंद्रीत केले आहे. शनिवारी रात्री कल्याणीनगर भागात वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली होती. भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांची तसेच कागदपत्रांची तपासणी केली जात होती. पोलिसांचे एक पथक वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी काही तरूण एका मोटारीतून निघाले होते. हे तरूण मुळचे सणसवाडी येथील आहेत.

police officer video
Pune Porsche Accident : रक्ताचा नमुना बदलण्याची आयडीया कोणाची, आरोपीच्या आईचा मोठा खुलासा

पोलिसांनी या तरुणांची चौकशी केली. त्यांच्याकडे गाडीची कागदपत्रे नसल्याने मोटारचालकाला दंड करण्यात आला. त्यानंतर नाकाबंदीतील पोलिस कर्मचारी गाडीतील एका तरुणाला घेऊन काही अंतरावर खुर्चीत बसलेल्या पोलिस अधिकाऱ्याकडे घेऊन गेला. या अधिकाऱ्याने या तरुणाची कडक शब्दात कानउघाडणी केली. त्याला पाय चेपायला सांगितले. या तरुणाने कारवाईच्या भीतीने पोलीस अधिकाऱ्याचे पाय चेपून दिले. त्यानंतर या तरुणाला तेथून जाऊ देण्यात आले.

police officer video
Talegaon Dabhade CEO Accused Drunk Driving: मद्यधुंद मुख्याधिकाऱ्याचा 'कार'नामा; तळेगाव दाभाडे येथे दोन गाड्यांना उडवून पलायन!

पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या या तरुणाकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकाराची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली असून संबंधित पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

police officer video
Pune Porsche Accident : 'कार'नामा करणाऱ्या बाळाच्या आई - वडिलांना बुधवारपर्यत पोलिस कोठडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com