आधी लग्न करून बघा, संसार काय असतो ते कळेल ;  कदमांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

आधी लग्न करून बघा, संसार काय असतो ते कळेल ; कदमांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Ramdas Kadam : आदित्य गद्दार तुम्हीच आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर रामदास कदम यांना कसं संपवायचा याचा कार्यक्रम सुरु होता
Published on

रत्नागिरी : शिंदे गटाचे आमदार रामदास कदम (ramdas kadam) यांनी रविवारी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर रामदास कदमांची सडेतोड टीका केली. (ramdas kadam latest news)

"आदित्य ठाकरे हे टुनटुन करत खोके खोके बोलत आहेत, आधी लग्न करून बघा, बायको आल्यावर मग संसार काय असतो ते कळेल. तेव्हा खोके काय ते कळेल, नुसती दाढी वाढवून काय उपयोग," असा टोला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना रामदास कदम यांनी हाणला. "मातोश्रीवर देखील खोके गेलेत, तोंड उघडायला लावाल तर भुकंप होईल. यांनी एवढे खोके खाल्ले, यांना डायबेटीस कसा होत नाही," असा सवाल कदम यांनी यावेळी उपस्थित केला.

आधी लग्न करून बघा, संसार काय असतो ते कळेल ;  कदमांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
Maratha Reservation : मराठा समाजाचा आज पुन्हा एल्गार ; कळंबला छावणीचे स्वरूप

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आदित्य ठाकरे यांनी रामदास कदमला संपवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु केला होता. २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर मला नाईलाजाने मंत्रीपद द्यावे लागले. नाहीतर शिवसेनेत असताना मी कधीही मंत्री झालो नव्हतो. माझ्यासाठी ते मुद्दाम खातं होतं, हा बाजूला बसला म्हणजे याचा चेहरा लोकांसमोर येणार नाही, असे प्रयत्न सुरु होते. पण त्यांना कुठे माहिती की, रामदास कदम आपला बाप आहे," असे कदम म्हणाले.

"आदित्य गद्दार तुम्हीच आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर रामदास कदम यांना कसं संपवायचा याचा कार्यक्रम सुरु होता," असे कदम यांनी सांगितले.

"पर्यावरण खाते मला संपवण्यासाठी मला दिलं, त्यांना वाटलं मला काही कळणार नाही. प्लॅस्टिक बंदीचा कायदा केला त्यावेळी आदित्य आपण केला आपण केला असं सांगत होते. दोन वर्ष माझ्या शासकीय बैठकांत अधिकार नसताना देखील ढवळाढवळ करत असत. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री. एखाद्याला संपवून टाकायचं गद्दारी याला म्हणता. मला आश्चर्य वाटतं की रश्मी ठाकरे कशा नाहीत, उद्धव ठाकरे जातील तिथे रश्मी ठाकरे असता. मासाहेब कधीच व्यासपीठावर चढल्या नाहीत," असे कदम म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com