Nana Patole : नाना, सबुरीनं घ्या; काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोलेंचे धरले कान

Congress Maharashtra Mp : काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची टिळक भवन येथे बैठक पार पडली. तेव्हा, नवनिर्वाचित खासदारांना सत्कार करण्यात आला.
nana patole
nana patolesarkaranama

Congess News : लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) काँग्रेसनं 17 जागा लढविल्या होत्या. यात 13 आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पाठिंबा दिल्यानं 14 जागा जिंकल्यानंर काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष बनला आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना 'बारा हत्तीचे बळ' आलं आहे.

महाविकास आघाडीत ( Mahavikas Aghadi ) काँग्रेसच मोठा भाऊ आणि विधानसभेला 150 जागा लढविणार, अशी वल्गना नाना पटोलेंनी केली. या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत वादाची 'ठिगणी' पडण्याची शक्यता होती. पण, यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करत नाना पटोलेंना ( Nana Patole ) कानपिचक्या दिल्या आहेत.

"महाविकास आघाडीत कोणी छोटा आणि कोणी मोठा नाही. महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणूक एकत्र लढली आहे. विधानसभा निवडणुकही एकत्र लढायची आहे," असं म्हणत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला ( Ramesh Chennithala ) यांनी नाना पटोलेंना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची टिळक भवन येथे बैठक पार पडली. तेव्हा, नवनिर्वाचित खासदारांना सत्कार करण्यात आला. या बैठकीला नाना पटोले, सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील, वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

nana patole
Lok Sabha Result Analysis : ...तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी करू शकते सत्तेत कमबॅक; तब्बल 150 मतदारसंघात लीड

आघाडीचं राजकारम सोप्प नसतं, असं चेन्नीथलांनी यावेळी म्हटलं. "सर्व घटक पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडी मजबूत केली आणि निवडणुकीला सामोरे गेलो. भाजपच्या हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले. जनतेनंही विश्वास व्यक्त महाविकास आघाडीला कौल दिला," असं चेन्नीथला यांनी म्हटलं.

"लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे. आता विधानसभा हे आपलं लक्ष्य आहे. लोकसभेसारखा लढा देऊन विधानसभेला महाविकास आघाडीचे सरकार आणू," असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com