

Mumbai. 20 June : सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निकालानंतर आमची मागणी निश्चितपणे ही राहणार आहे की, पवनराजे निंबाळकर यांची हत्या नेमकी कोणी केली? कोणा कोणाला काय कारणं होतं. वास्तवादी जे काही पुरावे आहेत, त्याचा योग्य तो तपास करून ते बाहेर येणं गरजेचेच आहे. तसेच, या प्रकरणी रचण्यात आलेल्या षडयंत्राची बऱ्यापैकी माहिती माझ्याकडे आहे, असा दावा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.
ते म्हणाले, अनेक गोष्टी मला आज बोलायच्या नाहीत. न्यायालयाच्या समोर अनेक गोष्टी आलेल्या आहेत. त्याबाबत योग्य तपास झाला, तर या प्रकरणातील खरे आरोपी कोण आहेत? हे आजही निदर्शनास येऊ शकतं, असा माझा ठाम विश्वास आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, पवनराजे निंबाळकर यांची दुर्दैवी हत्या झाली. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात राजकारण केलं गेलं. या घटनेचा वापर पूर्णतः राजकारणासाठी केला गेला. ते काही लोकांच्या सांगण्यावरून असेल. अनेकजण त्या सांगण्याला बळी पडले आणि दुर्दैवी घटनेचा पुरेपूर वापर झाला, हे वास्तव आहे.
सीबीआयच्या न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय ही नॉर्मल प्रोसेसर आहे. त्यात काही नवं नाही. तसेच, जे काही घडलं आहे, ते आज न्यायमूर्तीनी स्पष्ट शब्दांत नमूद केलेले आहे. निकालाचे वाचन केल्यानंतर सर्व गोष्ट स्पष्ट होणार आहेत. मलाही सविस्तर कळेल, त्यानंतर मी आपल्याशी बोलेन.
पवनराजे निंबाळकर खून आणि त्यानंतरचे षडयंत्र याबाबत कधी बोलायचे हे मी ठरवेन. जे काही षडयंत्र रचलं गेलं आहे, ते कोणी रचलं, कसं रचलं, याची बऱ्यापैकी माहिती मला आहे. ते कधी सांगायचे आणि पुरावे कधी उपलब्ध करून द्यायचे, हे मी ठरवेन, असा इशाराही राणा पाटील यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.