Rana Patil on Nimbalkar Murder Case : निकालानंतर राणा पाटलांचं सूचक विधान : हे धाराशिवचे राजकारण नव्हतं, तर महाराष्ट्राचं राजकारण होतं, योग्यवेळी सगळं सांगेन...

Pavanraje Nimbalkar Murder Case Result : पवनराजे निंबाळकर खून प्रकरणात 17 वर्षांनंतर न्याय मिळाल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या काळातील आयुष्याची भरपाई कोण करणार, असा सवाल उपस्थित केला.
Ranajagjitsinha Patil-pavanraje nimbalkar
Ranajagjitsinha Patil-pavanraje nimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 20 June : पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांची जी हत्या झाली, त्याला आज २० वर्षे होत आली आहेत. या प्रकरणाचा खटला गेली १७ वर्षांपासून चालू आहे. न्याय देवतेवर आमचा विश्वास होता आणि १७ वर्षांनंतर न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आहे. पण, या सर्व लोकांची १७ वर्षे कोण परत करणार आहे, असा सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निकालानंतर केला.

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांचा ३ जून २००६ रोजी नवी मुंबईत कळंबोली येथे ‘एक्सप्रेस वे’वर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्याचा निकाल आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला. या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर राणा पाटील बोलत होते.

डॉ पद्मसिंह पाटील यांना १७ वर्षे खुनाचे आरोप सहन करावे लागले. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना राजकीय षडयंत्र केलं गेलं. हे षडयंत्र कोणी केलं, त्यात कोण कोण प्यादं होतं. हे सर्व आता टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी पुढे येतील. पण, आजच्या निकालाने आम्हाला समाधान आहे. आज काय झालं आहे, हे मी डॉक्टरांना समजून सांगू शकत नाही आणि त्यांना ते कळणारही नाही, अशी खंतही राणा पाटील यांनी बोलून दाखवली.

ते म्हणाले, डॉ. पाटील हे १९९० च्या दरम्यान मुख्यमंत्री होणार होते. तसा त्यांना शब्दही देण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. २००९ मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले होते आणि कॅबिनेट विस्तारावेळी काही लोकांनी वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला. षडयंत्र रचलं गेलं, ते आज कोर्टाच्या माध्यमातून आमच्याही लक्षात आलेले आहे. त्यावर मी कोर्टाच्या निकालाचे वाचन केल्यानंतर सविस्तर बोलेन.

Ranajagjitsinha Patil-pavanraje nimbalkar
Archana Patil on Result : निकालानंतर अर्चना पाटलांनी 20 वर्षांचा पट उलगडा : गावोगावी जाऊन मंगळसूत्राची शपथ घेत ‘आम्ही कोणाचाही खून केला नाही’ असे सांगत होते

राजकीय षडयंत्र कोणी रचलं, यावर आज मी बोलणार नाही. हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ठ होतं, त्यामुळे आम्ही या प्रकरणावर जास्त बोलत नव्हतो. बरेच जण राजकीय फायदा घेत होते. धांदात खोटी विधाने करत होते. पण मी त्यावर काहीच बोललो नाही. योग्य वेळी गरजेनुसार अनेक गोष्टी मी पुढच्या काळात बोलेन, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

ते म्हणाले, आमचा न्यादेवतेवर विश्वास असून आम्ही आमची बाजू ठामपणे मांडू आणि पुढच्या न्यायालयातही आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेलं. बाहेरच्या जिल्ह्यातून (लातूर) या प्रकरणात राजकारण होतं, या आरोपांवर मी आज बोलणार नाही. या खटल्याला १७ वर्षे का लागली, यात वेळकाढूपणा कोणी केला. हे मी आज ना उद्या निश्चितपणे सांगेन.

Ranajagjitsinha Patil-pavanraje nimbalkar
Pawanraje Murder Case Verdict : ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात निकाल, उद्धव ठाकरेंच्या गटातून पहिली प्रतिक्रिया, 'त्यांना कळलं असेल आपलं...'

हे धाराशिवचे राजकारण नव्हतं, ते महाराष्ट्राचं राजकारण होतं. तुम्ही या प्रकरणाच्या खोलात गेला तर अनेक गोष्टी आपल्याही लक्षात येतील. योग्यवेळी मी त्याबाबत सांगेन, असे सांगून या प्रकरणाचे गूढ राणा पाटील यांनी आणखी वाढवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com