गुंड एजाज लकडावाला विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

लकडावाला याच्या विरोधात मुंबईत २५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. लकडावाला याच्या विरोधात मुंबईत २५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
Ejaz Lakdawala
Ejaz Lakdawalasarkarnama

मुंबई : मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथील व्यावसायिकाला (businessman) २ कोटींची खंडणी (Ransom)खंडणी मागितल्या प्रकरणी कुख्यात गुंड एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी लकडावाला आणि व्यावसायिकाची माहिती पुरवणाऱ्या साथीदाराविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा अधिक तपासासाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग होऊ शकतो.

लकडावालाने जून २०१३ ते मार्च २०१७ दरम्यान व्यावसायिकाला धमकावले होते, मात्र लकडावालाने दिलेल्या धमकीमुळे त्या व्यावसयिकाने पोलिसात धाव घेतली नाही. लकडावालाच्या अटकेची बातमी पाहिल्यानंतर त्याने धमकवलेले अनेक व्यावसायिक आता पोलिसांपुढे येऊन आपली तक्रार (Case) नोंदविण्यासाठी पुढे येत आहे.

पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी (Threat) व्यावसायिकाला दिली होती. या प्रकरणी लकडावाला आणि व्यावसायिकाची माहिती पुरवणाऱ्या साथीदाराविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकडावाला याच्या विरोधात मुंबईत २५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. लकडावाला याच्या विरोधात मुंबईत २५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

Ejaz Lakdawala
कोश्यारींचे सारचं किळसवाणं ; काय ते हातवारे, काय ते हसणं ; कॉंग्रेसनं उडवली खिल्ली

एजाज लकडावाला हा दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्याबरोबर काम करायचा. एजाज लकडावाला हा मूळ दाऊदच्या टोळीचा सदस्य होता. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर लकडावाला दाऊदच्या टोळीपासून वेगळा झाला. तेव्हापासून 2008 पर्यंत लकडावाला हा छोटा राजनच्या टोळीबरोबर काम करत होता. एजाज लकडावाला हा मूळ दाऊदच्या टोळीचा सदस्य होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com