Ratan Tata : उद्योगपती रतन टाटांना 'भारतरत्न द्या; राज्यमंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर

Ratan Tata Passes Away Updates : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. रतन टाटा यांचे कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही यावेळी संमत करण्यात आला.
Ratan Tata
Ratan TataSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 10 Oct : उद्योग विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व असणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री मुंबईत निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जा आहे. सोशल मीडियावरही सर्वसामान्य लोकांपासून ते अनेक दिग्गजांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Ratan Tata Death News)

रतन टाटा यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये असणारी प्रेमाची आणि आपुलकीची भावना पाहता राज्य सरकारने केंद्राकडे टाटा यांना भारतरत्न द्यावा अशी मोठी मागणी केली आहे. गुरूवारी (ता.10) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शोकप्रस्ताव मांडला.

Ratan Tata
Raj Thackeray : 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक गमावला' राज ठाकरे यांची भावनिक प्रतिक्रिया!

यावेळी रतन टाटा (Ratan Tata) यांचे कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही यावेळी संमत करण्यात आला. शिंदेंनी शोकप्रस्ताव म्हटलं की, "उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा.

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचा अभिमान

रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाज उभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान मोठे होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचा अभिमान होते.

Ratan Tata
Ratan Tata : कोट्यवधींची संपत्ती सोडून गेले रतन टाटा; आता कोण सांभाळणार उद्योग अन् कोण होणार उत्तराधिकारी?

त्यांनी मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे"; अशा शब्दात त्यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com