Narayan Rane on Uddhav Thackeray : राज ठाकरेंना उद्धवने छळलं; नारायण राणेंचा टीकेचा 'बाण'

Narayan Rane Slams Uddhav Thackeray for Harassing Raj Thackeray in Ratnagiri Sindhudurg : भाजप खासदार नारायण राणे यांनी फेसबुक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Narayan Rane on Uddhav Thackeray
Narayan Rane on Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena political controversy : राज्यातील महायुती सरकारला हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश रद्द करण्याची नामुष्की आली. हिंदी भाषा सक्तीविरोधातील लढ्यानं ठाकरे बंधू एकत्र आले. या लढ्याचा विजयी मेळावा, पाच जुलैला होत आहे.

तत्पूर्वी, सत्ताधारी भाजपकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 'लक्ष्य' केलं आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत, 'उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना अधोगतीला गेली. राज ठाकरेंचा छळ केल्याने ते बाहेर पडले', असा घणाघात केला.

भाजप खासदार नारायण राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या, असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते. त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत?"

राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले, यांनी सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे, असे घाणाघात खासदार राणे यांनी केला.

Narayan Rane on Uddhav Thackeray
Abu Azmi petition : अबू आझमींची न्यायालयात धाव; प्रतिवादींना बजावल्या नोटिसा

मराठी माणसाने व हिंदूंनी उद्धव ठाकरे यांना घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती!, असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला. दरम्यान, शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी राणे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Narayan Rane on Uddhav Thackeray
Raj Thackrey Politics: नाशिकमध्ये मनेसेने केली शिवसेनेची परतफेड, राज आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचा नवा अध्याय...

नारायण राणे 'एहसान फरामोश' माणूस

'नारायण राणे यांना राज ठाकरेंविषयी प्रेम आले असेल, तर आठ दिवसांपूर्वी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांची जागा दाखवली आहे. नाराणय राणे हा एहसान फरामोश माणूस आहे, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेले उत्तर पुरेसे आहे', असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

राणे कुटुंबियांची चोच नरकातच बुडालेली

'नारायण राणेंनी इतरांची काळजी करू नये. तुम्ही तुमचा पक्ष का सोडला. स्वतः पक्ष काढला होता. वर्षभरात पक्ष का सोडला. त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस का सोडला, याचे उत्तर द्या. चिपळूनच्या सभेत भाजपच्या रवींद्र चव्हाण यांना इशारा का दिलात. नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी मला विचारतच जाऊ नका. यांची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते', असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

मंत्री राणेंचा 'नेपाळी' असा उल्लेख

मंत्री नितेश राणे यांचा नेपाळी, असा उल्लेख करताना, माझ्यावर कोणत्या भाषेत टीका केली, याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. यांची चोच नरकातच बुडालेली आहे. त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com