Abu Azmi petition : अबू आझमींची न्यायालयात धाव; प्रतिवादींना बजावल्या नोटिसा

Samajwadi MLA Abu Azmi Moves High Court to Quash Criminal Cases : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनावेळी अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत स्तुतिसुमने उधळली होती.
Abu Azmi 2
Abu Azmi 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai political court case : औरंगजेबसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल असलेले दोन्ही गुन्हे रद्द करण्यासाठी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आणि सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनावेळी अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाबाबत स्तुतिसुमने उधळली होती. याप्रकरणी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. तसेच मरीन ड्राइव्ह आणि ठाणे इथं दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

कनिष्ठ न्यायालयाने (Court) आझमी यांना अटकपूर्व जामीनही मंजूर केला. त्यानंतर आता उच्च न्यायालायात धाव घेऊन दोन्ही गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे. आपल्या विधानांचा विपर्यास केला आहे. आपण निर्दोष असून विधानसभेने केलेले निलंबनही रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.

Abu Azmi 2
Maharashtra Assembly opposition leader history : विधानसभेत कमी आमदार, तरीही विरोधी पक्षनेता!

दाखल गुन्हे रद्द होण्यासाठी अबू आझमींनी न्यायालयात धाव घेतली असतानाच, पुन्हा अधिवेशनाच्या तोंडावर वारीविषयी वादग्रस्त विधान केले. मोठ्या पदयात्रेमुळे अनेक जिल्ह्यांमधील वाहतूक ठप्प झाल्याचे म्हटले. यासाठी त्यांनी पुण्याचा प्रवासाचा दाखला दिला. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीसाठी रस्ते बंद करण्यात आल्याने लवकर निघावे, असा निरोप आल्याची माहिती अबू आझमी यांनी दिली.

Abu Azmi 2
BJP Vs Shivsena : गोगावलेंचा राणेंवर वार; तळकोकणात वणवा; भाजप नेत्यांचा आक्रमक पवित्रा, थेट युतीवरच घाव

'वारीमुळे वाहतूक कोंडी होते. रस्ता जाम होतो. पण, मुस्लिमांनी कधीही तक्रार केली नाही. मुस्लिम आणि हिंदू भावांसारखे खांद्याला खांदा लावून चालतात. सलमानांनी नमाज अदा केल्यावर तक्रारी करतात. पण हिंदू-मुस्लिमांमध्ये जाणूनबुजून फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो', असे आमदार आझमी यांनी म्हटले. आझमी यांच्या विधानांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला. तसेच भाजपासह इतर पक्षांच्या नेत्यांनीही अबू आझमी यांच्या विधानावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com