मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana)यांना खार पोलिसांनी आज सायंकाळी अटक केली. मात्र, अटक करत असताना आणखी एक वाद निर्माण झाला आहे. पोलिस घेऊन जात असताना आमदार राणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्देशून अपशब्द वापरले आहेत. त्या प्रकरणी शिवसेनेचे पालघरचे आमदार श्रीनिवास वानगा (shrinivas vanga) हे पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहेत. (Ravi Rana used abusive language against Chief Minister Uddhav Thackeray)
गेली दोन दिवस हनुमान चालिसा पठणावरून मुंबईत हाय व्होलटेज ड्रामा सुरू होता. ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे नवनीत राणा आणि रवि राणा यांनी सांगितले होते. राणा दांपत्याने शिवसेनेची माफी मागावी, अशी मागणी करत राणा यांच्या घरासमोर गर्दी केली हेाती. त्यामुळे मुंबईत ताणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेनेच्या तक्रारीनंतर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना अटक केली. त्यांच्यावर १५३ अ हे कलम लावण्यात आले आहे.
दरम्यान, अटक केल्यानंतर आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. त्यावरून शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. शिवसेना नेत्यांकडून राणा दांपत्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आता पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वानगा यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी जामीन नाकारला आहे. रवि राणा व नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब यांच्याबद्दल मुंबई पोलिस उपायुक्त परिमंडल 9 यांच्याकडे तक्रार दिली आहे. आमदार रवि राणा आणि नवनीत राणा यांच्याकडून ॲड रिझवान मर्चंट आणि ॲड वैभव कृष्णा हे पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित होते.
मुंबई पोलीस रवी राणा आणि नवनीत राणा यांचे सर्व व्हिडिओ आणि पत्रकार परिषदेचे फुटेज गोळा करत आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेले सर्व व्हिडिओ पोलिस डाउनलोड करत आहेत, जेणेकरून या सर्व व्हिडिओंचे विश्लेषण करता येईल. सूत्रांनी सांगितले की राणा आणि नवनीत यांच्यावर आरोप आहे की त्यांनी एका व्हिडिओमध्ये अमरावतीच्या लोकांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते, मुंबई पोलिस या व्हिडिओचा शोध घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.