Dombivali BJP and Shivsena News : आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या नंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीसा तणाव दिसत होता आणि नाराजीही पाहायला मिळाली होती. मात्र यानंतर आता या एका कार्यक्रमानिमित्त या दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
खासदार क्रीडा संग्राम समारोहात डोंबिवलीतील भाजप आणि शिंदे गट एकत्र आलेला पाहिला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे राज्य मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे , आमदार बालाजी किणीकर , भाजपचे माजी नगरसेवक आणि शिंदे गटाच्या माजी महापौरांसह माजी नगरसेवक एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंधरा दिवसांपूर्वी आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हास नगर येथील पोलिस ठाण्यातच गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर कल्याण डोंबिवलीतील भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांचे संबंध डळमळीत झालेले पाहिला मिळाले होते.
या प्रकारानंतर दोन दिवसांतच खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यानंतर चार दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने खासदार क्रीडा संग्रामचे आयोजन डोंबिवलीतील ह.भ.प क्रीडा संकुलात करण्यात आले होते. परंतु गोळीबार प्रकारानंतर त्यांच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळे या कार्यक्रमाचे उद्घाटन देखील अत्यंत साधेपणाने करण्यात आले. मात्र या प्रकरणाला पंधरा दिवस होत आले असून खासदार क्रीडासंग्रामाचा समारोप मात्र मोठ्या उत्साहात झाल्याचे दिसत आहे.
गोळीबार प्रकरणानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात होते. इतकेच नव्हे तर सुरुवातीला आमदार मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी देखील श्रीकांत शिंदेंवर नाराजी व्यक्त केली होती. त्यातच गोळीबार प्रकरणानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी देखील एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेवर बरेच आरोप केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) कल्याण मधील विविध प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी कल्याण येथे आले होते. त्यानंतर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे बीएसयूपीची घरे वाटप करण्यात आली. यावेळी देखील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शेजारी बसलेल्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर ते चर्चा करताना दिसून आले. तर खासदार क्रीडा संग्राम व्यासपीठावरसुद्धा खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण व्यासपीठावर मनसोक्त गप्पा मारताना दिसून आले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.