Maharashtra BJP: अखेर प्रतीक्षा संपली! बावनकुळेंनंतर भाजपला नवा धडाकेबाज प्रदेशाध्यक्ष मिळाला

BJP News: चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण,असतील याची चर्चा सुरू झाली होती. मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले रवींद्र चव्हाण आणि डॉ.संजय कुटे यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या आघाडीवर होते.
Ravindra chavan, Narendra Modi, devendra fadanvis
Ravindra chavan, Narendra Modi, devendra fadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपकडून आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक मोठे बदल केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता गेल्या काही महिन्यांपासून सर्वांचेच लक्ष लागलेल्या महाराष्ट्र भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षपदी अखेर रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडीचा मेळावा मुंबईत मंगळवारी(ता.1 जुलै)रोजी आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्यात आता भाजपच्या दिल्लीतून पक्षनेतृत्वानं संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेल्या संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, चंद्रशेख बावनकुळे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.या नियुक्त्यांनंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची निवडही अंतिम टप्प्यात आल्याचं दिसून येत आहे.कारण आता चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी भाजप (BJP) नेमकी कोणाला संधी मिळणार,याची उत्सुकता आहे.

केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर भाजपनं प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या दृष्टीनं आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. याचमुळे लवकरच महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती.

Ravindra chavan, Narendra Modi, devendra fadanvis
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंच्या मनात बंडाची भीती? शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आणला 'हा' महत्त्वाचा प्रस्ताव

भाजपमध्ये 'एक व्यक्ती एक पद',असा नियम आहे.त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार,याची चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी भाजप नेमकी कोणाला संधी मिळणार,याची उत्सुकता आहे.

रवींद्र चव्हाण हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. नगरसेवक असताना चव्हाण 2009 मध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून पहिले विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 2014 आणि 2019, 2024 मध्ये चव्हाण यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकल्या.

Ravindra chavan, Narendra Modi, devendra fadanvis
Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंनी तुपेंना कोंडीत पकडले; ‘ही संधी पुन्हा नाही...सचिवांना बांधून आणण्याची परवानगी द्या अन्‌ तुमचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहून घ्या’

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवला. 2016 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे बंदरे, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री तसेच रायगड पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी होती. पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केले होते.

Ravindra chavan, Narendra Modi, devendra fadanvis
Shivsena News: 'हिंदी सक्ती'चा निर्णय मागे घेताच शिवसैनिकांनी फडणवीस सरकारला दाखवली 'ठाकरे ब्रँड'ची ताकद

चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण,असतील याची चर्चा सुरू झाली होती. मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले रवींद्र चव्हाण आणि डॉ.संजय कुटे यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या आघाडीवर होते. रवींद्र चव्हाण यांच्या नावावर अखेर भाजपचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com