Ravindra Chavan : मंत्री रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाडांनी कचऱ्याच्या मुद्द्यावरून केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

Political News : अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये बसून काम न करता रस्त्यावर उतरून प्रत्यक्षात काम केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
Ravindra chavan, ganpat Gaikwad
Ravindra chavan, ganpat GaikwadSarkarnama

भाग्यश्री प्रधान आचार्य

Kalyan News : कल्याण पूर्व येथे कचऱ्याची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेतील प्रभागांमध्ये स्वच्छतेच्या नियोजनासाठी जबाबदारी प्रत्येक कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक असताना कामाची जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये बसून काम न करता रस्त्यावर उतरून प्रत्यक्षात काम केले पाहिजे, अशा सूचना करीत कचऱ्याच्या मुद्द्यावरून मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये बसून काम न करता रस्त्यावर उतरून प्रत्यक्षात काम केले पाहिजे, असा सल्ला आमदार आणि कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला. तर आमदार गणपत गायकवाड यांनी कोट्यवधीचे कचऱ्याचे काँट्रॅक्ट दिले गेलंय, मात्र कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे कल्याण पूर्व येथे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे, अशी टीका आमदार गणपत गायकवाड यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केली.

Ravindra chavan, ganpat Gaikwad
Sangli News: चंद्रहार पाटील 'वंचित' कडून? काँग्रेसच्या विशाल पाटलांचे काय होणार?

स्वच्छतेबाबत नागरिकांची जनजागृती करण्यात आली आहे. घनकचरा विभागात कार्यरत असलेल्या कामगारांचा नियोजन महापालिकेने करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला विशेष निधी दिला. त्याबद्दल त्यांचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आभार मानले.

महापालिकेतील प्रभागांमध्ये स्वच्छतेच्या नियोजनासाठी जबाबदारी दिली पाहिजे. अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये बसून काम न करता रस्त्यावर उतरून प्रत्यक्षात काम केले पाहिजे, असा सल्ला केडीएमसी अधिकाऱ्यांना त्यांनी दिला. त्यासोबतच नागरिकांनीदेखील स्वच्छतेबाबत सहकार्य करावे, असे आवाहन रवींद्र चव्हाण (Ravindra chvahan) यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डीप क्लीन कॅम्पेन ही संकल्पना राबवण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार गणपत गायकवाड यांनी आभार मानले. महापालिका क्षेत्रात मुख्य रस्त्यांची साफसफाई केली जाते. मात्र, अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता केली जात नाही. कचऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे काँट्रॅक्ट दिले गेले आहे. मात्र, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही.

कल्याण पूर्व येथील स्वच्छतेच्या अवस्था अत्यंत बिकट असल्याची खंत व्यक्त करीत स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. त्यासोबतच डीप क्लीन कॅम्पेन ही मोहीम सातत्याने राबवली पाहिजे, अशी सूचना गायकवाड यांनी केली.

(Edited by Sachin Waghmare)

Ravindra chavan, ganpat Gaikwad
Ravindra Chavan : लोकसभेला चव्हाण, तर आमदारकीला डोंबिवलीत कोण? 'या' नावांची जोरदार चर्चा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com