Ravindra Chavan : लोकसभेला चव्हाण, तर आमदारकीला डोंबिवलीत कोण? 'या' नावांची जोरदार चर्चा

Kalyan- Dombivli Political News : रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाममंत्री असून ते डोंबिवलीतून सलग तीन वेळा निवडून येणारे भाजपचे आमदार आहेत.
PWD Minister Ravindra Chavan News
PWD Minister Ravindra Chavan NewsSarkarnama

भाग्यश्री प्रधान-

Dombivali News : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा झडताना दिसून येत आहेत. सुरुवातीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या, असा सूर स्थानिक भाजपनेत्यांसह आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून आळवला जात होता. मात्र, त्यानंतर आमदार चव्हाण यांनीच लोकसभा निवडणूक खासदार डॉ. शिंदेच लढवणार असे सांगितल्याने या गोंधळाला तूर्तास पूर्णविराम मिळाला.

पण आता लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तशा पुन्हा डोंबिवलीचे आमदार तथा कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा झडू लागल्या आहेत. मात्र, मंत्री आणि आमदार असलेल्या चव्हाणांनी जर खासदारकी लढवली तर डोंबिवलीत आमदारकी कोण लढवणार, या नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या नावांमध्ये मंदार हळबे आणि माजी महापौर राहुल दामले हे आघाडीवर आहेत.

PWD Minister Ravindra Chavan News
Lok Sabha Election 2024 : बच्चू कडू यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी कुणी मानले आभार...

एकीकडे 2024 मध्ये केंद्रात मोदी सरकार (Modi Government) आणण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात 48 पैकी 45 प्लस जागांचे लक्ष्य ठेवले आहे. भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेल्या विधानसभा मतदारसंघातील 6 आमदारांची खासदारकीसाठी वर्णी लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यापैकी सध्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, अद्यापही शिक्कामोर्तब झाले नाही. त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नसली तरी त्यांच्यानंतर डोंबिवली या भाजपच्या बालेकिल्ल्यात चव्हाण यांचे उत्तराधिकारी म्हणून कोण ? याचीदेखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सलग तीन वेळा निवडून आलेले उमेदवार...

रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाममंत्री असून ते डोंबिवलीतून सलग तीन वेळा निवडून येणारे भाजपचे (BJP) आमदार आहेत. चव्हाण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. मागील टर्ममध्ये राज्यमंत्री असतानाच चव्हाण यांच्याकडे भाजपने कोकण विभागाचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिली होती.

आता ते गेल्या दीड वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या दीड वर्षात पालकमंत्री म्हणून चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच जम बसविला आहे. त्यामुळे ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

PWD Minister Ravindra Chavan News
Truck Drivers Strike : ट्रकचालकाची औकात काढणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून उचलबांगडी

माजी महापौर दामले आणि हळबेंची चर्चा...

भाजपनेते रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची अद्याप उमेदवारी निश्चित झालेली नसली तरी त्यांच्यानंतर डोंबिवली या भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून कोण ? माजी उपमहापौर राहुल दामले की मनसेतून भाजपत आलेले माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे याचीदेखील आतापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दामले यांनी भाजपचे कार्यकर्ते म्हणूनही काम पाहिले आहे.

तर हळबे हे सुरुवातीपासूनच भाजपचे कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि आमदार चव्हाण यांच्यासमोर आमदारकीदेखील लढवली होती. यावेळी हळबे यांनी चव्हाण याना चांगलीच फाईट दिल्याचे चित्र होते. इतकेच नव्हे, तर हळबे संघाच्या फारच जवळचे असल्याने हळबे यांचे पारडे जड आहे. त्यामुळे कदाचित हळबे यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

PWD Minister Ravindra Chavan News
Raj Thackeray: राज ठाकरेंचे इंजिन का येईना ट्रॅकवर ? ही आहेत कारणे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com