Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर तब्बल वीस वर्षांनी 'मातोश्री'वर; काय झालं मधल्या काळात?

Matoshri: धंगेकरांच्या शिवसैनिक ते आमदार प्रवासामुळे ठाकरेंना आनंद
Ravindra Dhangekar, Uddhav Thackeray
Ravindra Dhangekar, Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray: कसब्याची निवडणूक जिंकून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झालेल्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी तब्बल २० वर्षांनंतर बुधवारी 'मातोश्री'ची पायरी चढली. तेथे त्यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शाबासकी मिळवली.

याआधी शिवसेनेचे नगरसेवक असतानाही म्हणजे, २००३-०४ मध्ये धंगेकर मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तेव्हाचे भारतीय विद्यार्थी सेनेचे नेते आणि आजघडीचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मूळ शिवसैनिक राहिलेल्या आणि भाजपचा पराभव केलेल्या धंगेकर यांना पाहून ठाकरेही खूष झाल्याचे दिसून आले.

आमदार धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि विभागप्रमुख पदांवर काम केलेले आहे. या पदांची जबाबदारी असताना ते अनेकदा 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) भेट घेत होते. पुणे महापालिकेत ते पहिल्यांदा म्हणजे, २००२ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक झाले.

या काळात २००३ मध्ये पुण्यातील एका पदाधिकाऱ्यांची तक्रार करीत धंगेकर हे बाळासाहेबांच्या भेटीला गेले होते. या काळातील नगरसेवकपदाची मुदत संपण्याआधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या बंडाला साथ देत, धंगेकरांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला अन् ते मनसेत गेले.

Ravindra Dhangekar, Uddhav Thackeray
Namita Mundada: मतदारसंघातील प्रश्नांसाठी आमदार नमिता मुंदडा चिमुकलीसह सभागृहात

धंगेकर महापालिकेच्या २००७ आणि २०१२ च्या निवडणुकांत मनसेकडून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यामुळे ते 'मातोश्री'पासून लांब झाले. २०१७ च्या निवडणुकीनंतर तर धंगेकरांनी काँग्रेसला साथ दिल्याने ते पुढच्या काळात कधीच 'मातोश्री'वर जाणार नसल्याचे स्पष्ट होते. परंतू, कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या (MVA) ताकदीवर धंगेकर आमदार झाले.

या निवडणुकीत शिवसेनेचा एक नंबरचा राजकीय शत्रू ठरलेल्या भाजपच्या (BJP) उमेदवाराचा धंगेकरांनी पाडाव केला. त्यामुळे काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उत्साह आहे. या निवडणुकीत 'जायंट किलर' ठरलेले धंगेकर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. विधानसभा सदस्यपदाच्या शपथविधीनिमित्त धंगेकर हे बुधवारी मुंबईत आले. ते पहिल्यांदा 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेटी घेतली. निवडणुकीत साथ दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी आलेले धंगेकर दोन दशकानंतर 'मातोश्री'वर आले.

Ravindra Dhangekar, Uddhav Thackeray
Politics : धंगेकरांच्या राजकारणाचा अनोखा पॅटर्न; सकाळी खर्गे, नंतर 'मातोश्री'वर हजेरी अन् राज ठाकरेंचीही भेट

उद्धव ठाकरे आणि आदित्य (Aditya Thackeray) यांची भेट घेताच, धंगेकरांनी जुन्या आठवणी सांगितल्या. कसब्यातील लढतीत जुन्या शिवसैनिकाने पाडल्याचा आनंदही ठाकरे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले. तर एवढ्या वर्षांनी 'मातोश्री'वर येण्याचा योग आल्याचा आनंदही झाला होता. कसब्यातील या निवडणुकीत आदित्य यांनी तर नियोजित नसतानाही 'रोड शो' करून जबरदस्त गर्दी खेचत, धंगेकरांना साथ देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्यानंतर सभा घेऊन धडाक्यात प्रचारात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com