Ravindra Waikar On Kirit Somaiyya : वायकरांनी पाच तासांची चौकशी संपवली अन् सोमय्यांची पार लाजच काढली

Thackeray Group Vs State Government : शिंदे-फडणवीस-पवार सरकार ठाकरे गटावर सूड उगवत असल्याचा केला आरोप
Ravindra Waikar, Kirit Somaiya
Ravindra Waikar, Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महापालिकेच्या गार्डनच्या जागेत पाचशे कोटी रुपयांचे हॉटेल बांधलेल्या प्रकरणात शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार रवींद्र वायकरांची गुन्हे शाखेने तब्बल पाच तास चौकशी केली. ही चौकशी आटोपून ऑफिसबाहेर आलेल्या वायकरांनी भाजप नेते किरीट सोमयऱ्यांना शब्दश: झोडपून काढले. सोमय्यासारखा नीच माणूस तक्रारी करतो आणि आमच्या चौकशा होतात. ‘तोंड दाखवायला जागा नसताना, हा माणूस सरकारी ऑफिसमध्ये कसा येतो, असा सवाल करीत वायकरांनीही चौकशीचा सारा राग सोमय्यांवर काढला. या प्रकरणातील चौकशीला तोंड देताना वायकर हे आता सोमय्यांना उघडे पाडण्याच्या बेतात दिसले. (Latest Political News)

Ravindra Waikar, Kirit Somaiya
Shrirang Barane Vs Bala Bhegde : श्रीरंग बारणे-बाळा भेगडे यांच्यात वादाची ठिणगी? मावळातील रेल्वे स्टेशनवरून रंगला कलगीतुरा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री रवींद्र वायकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. यासाठी ते शनिवारी सकाळीच मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर जोगेश्वरी येथील गार्डनसाठी राखीव भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी दिशाभूल करून परवानगी मिळवल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकरांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. यानंतर आक्रमक झालेल्या वायकरांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले.

चौकशीनंतर वायकरांनी सांगितले, "पाचशे कोटींचा घोटाळ्याचा आरोप करत माझी तक्रार केली होती. या प्रकरणी मला आधीच बोलावले होते पण वेळ वाढवून मागितल्याने आज चौकशी झाली. मी कोणतीही चोरी, गैरप्रकार केलेला नाही. त्यामुळे कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक असल्याने येणाऱ्या संकटांपुढे झुकणारा नाही", असा इशाराही वायकरांनी आरोप करणाऱ्या सोमय्या आणि सरकारला दिला आहे.

Ravindra Waikar, Kirit Somaiya
Kishor Patil News : पत्रकाराला शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार पाटील म्हणतात... ही बाळासाहेबांची स्टाईल

वायकरांनी आक्षेपार्ह ‘व्हिडिओ’वरून सोमय्यांची इभ्रतच काढली. चौकशीनंतर संपूर्ण राग त्यांनी सोमय्यांवर काढल्याचे दिसून आले. "एखादा मनुष्य खोटा आणि विकृत असेल तर त्याला लिंगपिसाटच बोलले पाहिजे. किरीट सोमय्या सारखा नीच माणूस हा आमच्या तक्रारी करत आहे. खरे तर आता त्यांना तोंड दाखवायला जागा नाही, मात्र ते तोंड वर करून आमच्या तक्रारी करतात. बाळासाहेबांचा निष्ठवान असल्याने आम्ही कोणाला घाबरत नाही. मी त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही."

Ravindra Waikar, Kirit Somaiya
Cabinet Expansion : राज्यात लवकरच आचारसंहिता; मग मंत्रिमंडळ विस्ताराचा काय फायदा; बच्चू कडूंची नाराजी कमी होईना

शिवसेना फुटल्यानंतरही ‘मातोश्री’प्रति असलेली श्रद्धा कायम ठेवणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड घोटळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एकीकडे पडणेकरांवर गुन्हा दाखल झाला तर दुसरीकडे वायकरांचीही चौकशी सुरू आहे. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्षातूनच वायकर आणि पेडणेकरांना घेरण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या प्रकारांमुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com