Ravindra Waikar Five Star Scam : ठाकरे गटाचे आमदार वायकरांच्या अडचणी वाढणार? कथित 'फाईव्ह स्टार' घोटाळा...

Ravindra Waikar In Five Star Scam : किरीट सोमय्यांनी केला होता आरोप..
Ravindra Waikar In Five Star Scam :
Ravindra Waikar In Five Star Scam :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईतील ५०० कोटींचा कथित फाईव्ह स्टार हॉटेल घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट येत आहे. आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, यात मुंबई पालिकेच्या (BMC News) अर्धा डझन अधिकारीही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Ravindra Waikar In Five Star Scam :
Chandrashekhar Bawankule News : पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला !

मुंबई पोलिसांच्य़ा आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महानगर पालिकेच्या अर्ध्या डझन अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. जमिनींच्या व्यवहाराची प्रक्रिया आणि तपशील जाणून घेण्यासाठी या सहा अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. हा सुरूवातीच्या टप्प्यातला तपास होता, असं सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ११ मार्च २०२३ यांनी या प्रकरणी लेखी तक्रार केली होती.

Ravindra Waikar In Five Star Scam :
Chandrashekhar Bawankule News : पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला !

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी विरोधकांच्या एकूण बारा जणांची भ्रष्ट नेते म्हणून कथित यादी काढली होती. याला त्यांनी डर्टी डझन असे नावे दिले होते. रवींद्र वायकर यांच्यावरही या प्रकरणात त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता पुढील कारवाई होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com