Chitra Wagh : ज्येष्ठांना डावलून 'मर्सिडीज बॉय'ला मंत्रिपद दिलं ; ठाकरे पिता-पुत्राला टोला

Chitra Wagh : पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती.शेवटी पक्षातच महाभारत घडलं, असे वाघ यांनी म्हटलं आहे.
Chitra Wagh, Uddhav Thackeray
Chitra Wagh, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

पुणे : सध्या शिवसेना-भाजपमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या राजकीय महाभारतात आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची एन्ट्री झाली आहे. (Chitra Wagh latest news)

चित्रा वाघ यांनी टि्वट करुन ठाकरे पिता-पुत्राचा समाचार घेतला आहे. त्यांनी "शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून 'मर्सिडीज बॉय'ला मंत्रिपद दिलं," अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली आहे.

"शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केलं आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले. पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती. शेवटी पक्षातच महाभारत घडलं. आता तरी धृतराष्ट्रानं डोळ्यावरची पट्टी काढावी… डोळ्यासमोरील ‘अंधार’ दूर करावा,'असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Chitra Wagh, Uddhav Thackeray
फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली ; ठाकरेंचे प्रत्युत्तर

पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं मागील अडीच वर्षात पाहिलंय..शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केलं आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले.पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती.शेवटी पक्षातच महाभारत घडलं, असे वाघ यांनी म्हटलं आहे.

"कित्येक घटना डोळ्यांसमोर आहेत…देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसानं आजवर सोडली नाही. आता तर भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केलंय. अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार.. नुकतंच अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं," अशा शब्दात वाघ यांनी सुनावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com