‘रिमोट कंट्रोल’चा फोन आला अन्‌ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली!

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नको होती.
Chandrakant Patil

Chandrakant Patil

sarkarnama

Published on
Updated on

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी नकार दिल्यानंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा घाट घातला होता. मात्र, ज्या नेत्यांच्या सल्ल्याने राज्य चालले आहे. अशा ‘रिमोट कंट्रोल’ने फोन केला आणि त्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केला. (remote control's phone call and assembly Speaker election was postponed)

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील भाष्य केले. ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दादागिरी करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. सकाळी अकरापर्यंत कळवा; नाहीतर तुमची परवानगी गृहीत धरू, असं त्या पत्रात राज्यपालांना म्हटलेले होते. त्या पत्राची भाषाही धमकावण्याची होती. तरीही राज्यपाल ठाम राहिले. त्यांनी नव्या नियमांचा अभ्यास करायचे आहे, असे सांगून निवडणूक तातडीने घेण्यास नकार दिला.

<div class="paragraphs"><p>Chandrakant Patil</p></div>
मोदींची पवारांना सत्ता स्थापनेची ऑफर आणि चंद्रकांत पाटील म्हणतात...

राज्यपालांच्या नकारानंतरही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घाट महाआघाडीच्या नेत्यांनी घातला होता. मात्र, ज्या नेत्यांच्या सल्ल्याप्रमाणे राज्य चालले आहे. अशा ‘रिमोट कंट्रोल’ने फोन करून सांगितले की, राज्यपालाच्या संमतीशिवाय निवडणूक घेणे, ही घटनेचे उल्लंघन ठरेल. त्यातून राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते. त्यांना खुर्ची एवढी प्यारी आहे की त्यामुळे शेवटी ही निवडणूकच पुढे ढकलण्यात आली, असे चंद्रकांतदादांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Chandrakant Patil</p></div>
चंद्रकांतदादांचा नवा बॉम्ब : सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ!

ते पुढे म्हणाले की, मुळातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नको होती. या दोन्ही पक्षांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निवडणूक घेण्याचा केवळ फार्स केला. दम होता तर का घेतली नाही निवडणूक? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी केला. महत्वाचे म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेटून नेण्याचा डाव आम्ही हाणून पाडला, असा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com