मोदींची पवारांना सत्ता स्थापनेची ऑफर आणि चंद्रकांत पाटील म्हणतात...

त्यांच्यात काय बोलणे झाले, हे आपल्यासाख्यांना कळणे अवघड आहे.
sharad Pawar-Narendra Modi-chandrakant Patil

sharad Pawar-Narendra Modi-chandrakant Patil

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यात भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याची राष्ट्रवादीला ऑफर दिली होती, हे सांगायला शरद पवारांना (Sharad Pawar) इतका वेळ का लागला. पण, अशी ऑफर मिळाली असती तर ती नाकारण्याइतका असंमजसपणा पवारांमध्ये नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पवार यांच्या वक्तव्यावर दिली. (Modi's offer to Pawar to establish power and Chandrakant Patil says ...)|

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी (ता. २९ डिसेंबर) एका मुलाखतीत राज्य सरकार स्थापन करण्यासाठी मोदींनी आपल्याला ऑफर दिली होती, असे सांगितले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आमदार पाटील बोलत होते.

sharad Pawar-Narendra Modi-chandrakant Patil

चंद्रकांतदादांचा नवा बॉम्ब : सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ!

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी ऑफर दिली होती, हे सांगायला शरद पवार यांना इतका वेळ का लागला. मुळात मोदी-पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्यात काय बोलणे झाले, हे आपल्यासाख्यांना कळणे अवघड आहे. पण, अशी ऑफर मिळाली असती, तर ती नाकारण्याइतका राजकीय असंमजस्यपणा पवार यांच्यात मुळीच नाही. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता त्यावर काय बोलणार? आणि कोणाचे काय बोलणे झाले? हे मला माहिती नाही.

sharad Pawar-Narendra Modi-chandrakant Patil

मतदानादिवशीच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत अडचणीत

शरद पवारांचा इतिहास खरे बोलण्याचा नाही, असे धक्कादायक वक्तव्यही चंद्रकांत पाटील यांनी केले. त्याबाबत विचारले असता त्यांनी तुम्हाला माहीत आहेच की, असे म्हणत या प्रकरणातून लगेच अंग काढून घेतले. शरद पवारांचे म्हणणे खरं की खोटं मानायचे हा तुमचा विषय आहे. मोदी आणि पवार, पवार आणि अजितदादांचं, अजित पवार आणि अमित शहा तसेच फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये काय बोलणं झालं. हे सांगण्याइतका मी मोठा नेता नाही. इतके जाहीरपणे सांगण्याइतका अपरिपक्वही नाही.

sharad Pawar-Narendra Modi-chandrakant Patil

अजितदादांना फडणवीसांसोबत सरकार स्थापनेसाठी तुम्हीच पाठवलं होतं का? शरद पवार म्हणाले..

नीतेश राणे प्रकरणाबाबत कायदा कायद्याचे काम करतोय, या अजित पवारांच्या विधानावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कलेक्टर आणि एसपी यांचे कॉल चेक केले तर कळेल, कोण कोण दबाव आणत आहे. त्यातून सगळेच उघडकीस येईल, त्यामुळे अजितदादांनी कायद्यानेच काम करावे. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. कारण आम्हाला न्यायालये आहेत, त्यावर तुमची दादागिरी चालणार नाही. यापूर्वी राणेंना अडकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यावेळी ते तोंडावर पडले.

नीतेश राणेंचा मताचा अधिकार काढून घेतला आहे. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. सत्तेचा दुरुपयोग शक्य तितका केला जात आहे. पण या सर्वांना राणे पुरून उरतील, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com