Krushi Sevak Mandhan: कृषी सेवकाचे मानधन आता १६००० रुपये होणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

CM Eknath Shinde In Assembly Session: ज्या टपरीचालकाचे नुकसान झाले आहे, त्यांनाही ५० हजार रुपये भरपाई दिली जाणार आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील कृषी सेवकांना सहा हजार रुपये मानधन मिळत होते. त्यात दहा हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कृषी सेवकांना आता १६००० रुपये मानधन मिळणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत (Assembly) केली. (Remuneration of agricultural servant will now be Rs 16,000: CM's announcement in Assembly)

राज्यात अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घरांचे आणि संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांना पूर्वी पाच हजार रुपये नुकसान भरपाई दिली जायची, ती आता दहा हजार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, ज्या टपरीचालकाचे नुकसान झाले आहे, त्यांनाही ५० हजार रुपये भरपाई दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
Solapur In Monsson Session : प्रणिती शिंदेंच्या प्रश्नावर जयंतरावांनी मुश्रीफांची केली कोंडी; ‘अर्थमंत्री तुमचेच आहेत, घोषणा करा...’

शिंदे म्हणाले की, महिला बचत गटाचे खेळते भांडवल १५ हजार रुपये होते, ते आता ३० हजार रुपये देण्यात येणार आहे. महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू केंद्र सरकारच्या युनिटी मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.

कृषी सेवक हा गावपातळीवर काम करणारा आहे. कृषी सहायकांच्या बरोबरीने सरकार आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे तसेच मार्गदर्शन करण्याचे काम कृषी सेवक करत असतात. या कृषीसेवकांना तुटपुंज्या ६००० रुपये मानधनावर काम करावे लागत होते.

Eknath Shinde
Assembly Session : ‘झोपडपट्टी’बाबतचे बिल विधानपरिषदेने परत पाठविले; पृथ्वीराजबाबांनी सरकारला धू धुतले, फडणवीसांकडून चूक मान्य

महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये कृषी सेवक पदाची निर्मिती केली. पहिल्या तीन वर्षांसाठी सुरुवातीला २५०० मानधनावर भरतीस मंजुरी दिली होती. त्यानंतर आठ वर्षांनंतर २०१२ मध्ये मानधन वाढ करून ६००० रुपये मानधन करण्यात आली होती. त्यानंतर आता ११ वर्षांनी सरकारने मानधनात दहा हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com