MNS News: मनसेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; गजानन काळेंवर आरोप करत उपशहर अध्यक्षांचा राजीनामा

पदाला न्याय देता येत नसेल तर पद घेऊन तरी काय उपयोग?
Prasad Ghorpade Resign
Prasad Ghorpade Resign Facebook @Prasad Ghorpade

MNS leader Prasad Ghorpade resigns : मनसेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईत मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी राजीनामा दिला आहे. इतकेच नव्हे तर प्रवक्ते गजानन काळेंवर गंभीर आरोप केले आहेत. घोरपडे यांनी गजानन काळे धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केले आहेत.

खरंतर दोन दिवसांपूर्वीच ठाण्यात मनसेचा वर्धापन दिन पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना संबोधित केले. पण दोन दिवस उलटत नाहीत तर ठाण्याच्या बाजूला असलेल्या नवी मुंबईतून मनसेमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. प्रसाद घोरपडे यांनी राज ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याच्या पत्रात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

Prasad Ghorpade Resign
MVA Leaders: 'ईडी'च्या सगळ्या कारवाया बोगस, भंपक अन् खोट्या; महाविकास आघाडीतील नेते संतप्त

पक्ष वाढवण्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करतो. पण गजानन काळे कार्यकर्त्यांमध्येच भांडणे लावत असल्याचा आरोप घोरपडेंनी केला आहे. कोपरखैरणेत माझ्या विरोधात मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांना पदे दिली. माझ्या आणि पक्षा विरोधात त्यांच्या कारवाया सुरू असल्याचं घोरपडेंनी पत्रात म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर, गजानन काळेंनी कार्यालयात येऊन मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली. याची वरिष्ठांकडे तक्रार करुनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची खंत घोरपडेंनी पत्रात व्यक्त केली आहे.

तसेच, पदाला न्याय देता येत नसेल तर पद घेऊन तरी काय उपयोग? असा प्रश्न घोरपडेंनी उपस्थित केला आहे. काळे मनसेत आल्यापासून अनेक लोकांनी सोडले. त्यांचे पक्ष सोडण्याचे कारणही काळे हेच आहेत. काळे शहर अध्यक्ष आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत काम करणं शक्य नाही. पक्षाच्या अंतर्गतवादाला कंटाळलो आहे. पक्षाच्या वरिष्ठांना काल राजीनामा दिला आहे. काळेंनी धमकी दिल्यामुळेच राजीनाम्याचा निर्णय घेत असल्याचे घोरपडेंनी पत्रात म्हटलं आहे. पण पक्षामध्ये राहून काम करणार असल्याचंही त्यांनी नमुद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com