Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले, 'वाचा आणि थंड बसा' अन् सांगितली, 'महागड्या काळ्या गाडीची गोष्ट'

Black Car in Mantralaya : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण आणि कोणाची आहे ही काळी गाडी? तसेच, बीड-परभणी घटनेत आरोपी कोण? हे राज्यातल्या शेंबड्या पोरालाही माहित आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
Rohit Pawar on Black Car in Mantralaya
Rohit Pawar on Black Car in Mantralayasarkarnama
Published on
Updated on

Beed and Parbhani incident and Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टच्या सुरुवातीला त्यांनी 'वाचा आणि थंड बसा' अन् 'महागड्या काळ्या गाडीची गोष्ट' हा मथळा दिलाय त्यामुळे अनेकांना ही नेमकी काय भानगड आहे, हे जाणून घ्यावे वाटत आहे.

रोहित पवार(Rohit Pawar) आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगतात, ''व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंत्रालयातील काळी गाडी. या काळ्या गाडीच्या मालकाचे नाव आहे कुमार मोरदानी. या व्यक्तीविषयी कुठ्लाही राजकारणी किंवा अधिकारी बोलणार नाही, मीडिया देखील बोलणार नाही कारण हा व्यक्ती सर्वांची काळजी घेतो. या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या नावे ५० हून अधिक कंपन्या ministry of corporate affairs कडे नोंद असून या महागड्या व्यक्तीने अनेक बँकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे.''

तसेच ''गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. त्यामध्ये ग्राहकांनी ज्या प्रकल्पासाठी १९ कोटी दिले, बँकांनी ज्या प्रकल्पासाठी २०२ कोटीचे कर्ज दिले ते पैसे त्या प्रकल्पासाठी न वापरता २२१ कोटीपैकी १९६ कोटी दुसरीकडेच वळवले, शिवाय प्रकल्पाला ६ मजल्यांची परवानगी असताना १३ मजले बांधले आणि रेरा कायद्याचंही उल्लंघन केलं.'

याशिवाय ''एका दुसऱ्या प्रकरणात तर SRA कायद्याअंतर्गत वाढीव FSI घेतला परंतु SRAची कामे न करता शासनाची फसवणूक केली. त्यासंदर्भात तर २०१७ मध्ये तत्कालीन विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला. शासनानेही फसवणूक झाल्याचे मान्य केले, ज्या सदस्यांनी हा मुद्दा मांडला त्यापैकी धनंजय मुंडे(Dhananjay munde) आणि नितेश राणे हे सदस्य सध्या मंत्रिमंडळात आहेत. ही महागडी गाडी मंत्रालयात आली तर मंत्रालयात त्यांचं कामही तेवढंच महागडं असेल. पनवेल येथे रोडलगत ११६ एकर जमीन जी जमीन पूर्वी शासनाची भोगवटा – वर्ग २ मध्ये होती, त्यासंदर्भातली फाईल क्लिअर करण्यासाठी एका मंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पनवेलमध्ये ११६ एकर रोडलगत जमीन म्हणजे ७०० कोटीहून अधिकच महागडा विषय आहे आणि देवाणघेवाणही महागच असेल, यात कुठलीही शंका नाही .'' असंही रोहित पवारांनी सांगितलं.

Rohit Pawar on Black Car in Mantralaya
Raju Shetti : राजू शेट्टींनी दिला इशारा! म्हटले, ''चौपट मोबदला द्या, मगच..''

तर ''एरवी सर्वसामान्य जनतेची नाकाबंदी करणाऱ्या मंत्रालयीन व्यवस्थेने या महागड्या गाडीला विशेषतः ज्या गाडीचा मालक शासनाची फसवणूक करण्याच्या अनेक गुन्ह्यात गुन्हेगार आहे, अशा गुन्हेगाराला सर्व नियम धाब्यावर बसवून कुठलीही चौकशी न करता थेट आत सोडलेच कसे? हा प्रश्न आहे, पण ही गाडी सोडण्यासाठी एका उपमुख्यमंत्री कार्यालातून फोन आल्याचे सांगितले जात आहे.'' अशी माहितीह रोहित पवारांनी दिली.

आपल्या पोस्टमध्ये पुढे रोहित पवार म्हणतात ''बीड-परभणी घटनेत आरोपी कोण? आरोपीच्या जवळचे कोण? तपास कसा होतोय? हे राज्यातल्या शेंबड्या पोरालाही माहित आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही माहित आहे. छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारा आपटे जसा काल पुरव्याअभावी सुटला. तसेच बीड-परभणी घटनेतील आरोपी देखील सुटतील. दोषींवर कारवाई होणार नाही हीच भीती अधिक आहे. कारण आरोपी धनदांडगे आहेत तर पिडीत सर्वसामान्य आहेत. मंत्रालयातल्या महागड्या गाडी प्रकरणातही ती व्यक्ती कोणत्या कामासाठी आली? कुणाला भेटली? हे सर्वांनाच माहित आहे पण कुणी बोलणार नाही कारण ती व्यक्ती धनदांडगी आणि सत्तेशी संबंधीत आहे.''

Rohit Pawar on Black Car in Mantralaya
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचे मोठे विधान; म्हणाले,'धनंजय मुंडेंबाबतच्या मागणीचा कोणताच पुरावा नाही, असेल तर सोडणार नाही...'

याचबरोबर ''एकीकडे देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभर मोर्चे निघत आहेत पण त्यांची दखल शासन घेत नाही, परंतु दुसरीकडे महागड्या गाडीच्या महागड्या मालकाचे बेकायदेशीर काम करून देण्यासाठी मंत्रालयात पायघड्या अंथरल्या जातात, हे आपल्या कायदा सुव्यवस्थेचं भीषण वास्तव आहे.'' असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये शेवटी म्हटलेलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com