Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची दुसऱ्यांदा 'ईडी' चौकशी'; दादा गटाकडून खिल्ली!

Ajit Pawar On Rohit Pawar ED : नुकतीच त्यांची तब्बल 10 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
Rohit Pawar Ed Enquiry
Rohit Pawar Ed EnquirySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना दुसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. नुकतीच त्यांची तब्बल 10 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यांच्या या चौकशीच्या फेऱ्यांमुळे शरद पवार गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून याची खिल्ली उडवली जात आहे. यामुळे दोन्ही गटात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. Latest Marathi News, Rohit Pawar ED Enquiry

अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आमदार रोहित पवारांवर पुन्हा एकदा टीका करत, खिल्ली उडवली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा रोहित पवार ईडी चौकशीला गेले होते, तेव्हा देखील त्यांनी खिल्ली उडवली होती. आज दुसऱ्यांदा त्यांना बोलावण्यात आलं आहे. तेव्हा देखील त्यांनी ट्विट करत त्यांच्यावर खोचक भाष्य केलं आहे. (Latest Political News)

Rohit Pawar Ed Enquiry
Rohit Pawar : रोहित पवार 'ईडी' कार्यालयात असताना आमदार शिंदे नेमके कोठे होते?

रोहित पवार यांचे आज पुन्हा एकदा रडगाणे पाहायला मिळणार आहे. बजेट मांडल्यावर सगळे कॅमेरे बालमित्र मंडळाकडे फिरतील, अशी टीका त्यांनी ट्विटद्वारे (एक्स) केली आहे. रोहित पवार यांचे ईडी चौकशीला जाणे म्हणजे राजकीय नाट्य असल्याची टीका अजित पवार गटाकडून केली जात आहे. जर त्यांना चौकशीला जायचंच आहे, तर मग शांततेत गेलं पाहिजे, असा राजकीय स्टंट करण्याची गरज नाही. आपण किती सहनशील आहोत आणि कसा अन्याय होतोय? हे दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु असल्याची टीका त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील आणि तनपुरेंच्या वेळी पक्ष कुठे होता?

गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांची देखील ईडी चौकशी झाली. त्यांचीही अनेक तास ईडीने केली. मात्र, तेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते तिथे उपस्थित नव्हते. जयंत पाटील जेव्हा ईडी चौकशीला गेले तेव्हा त्यांनी कोणालाही जमू नये, असे आव्हान केलं होते. परंतु कार्यकर्ते जमले होते. मात्र, आता जेव्हा रोहित पवार जात आहेत तेव्हा सगळ्यांना सांगण्यात आलं आहे की, मुंबईत एकत्रित जमा, हे कशासाठी? असा सवाल मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Rohit Pawar Ed Enquiry
NCP News: BJP नेत्यांवर ED कारवाई दाखवा, 1 लाखाचे बक्षिस जिंका! NCPकडून बॅनरबाजी

रोहित पवारांची दुसऱ्यांदा चौकशी -

ईडीने बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड सोबतच, कन्नड एसएसके औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीशी संबंधित रोहित पवार यांची 11 तास चौकशी केली आणि त्यांना 1 फेब्रुवारी रोजी पुन्हा समन्स बजावले. पण एका केस संदर्भात दोन तपास यंत्रणांच्या चौकशीची दिशा वेगळी असल्याने कुणाचा तपास योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे.

कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस -

रोहित पवार यांना जेव्हा 24 तारखेला ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं, त्या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी ईडी कार्यालयाचा परिसर आणि राष्ट्रवादी कार्यालयाच्या परिसरात जमले होते. मात्र आता पोलिसांनी थेट या आंदोलनकर्त्यांना नोटीसी पाठवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं असताना देखील नोटिसा बजावण्यात येत आहे. देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही आहे की नाही? असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. जर लोकशाही असेल आणि हुकूमशाही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात शिंदे सरकारने जाहीर केली नसेल, तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर देखील जाऊन आंदोलनाला बसू शकतो. हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे, असं विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com