Nagpur Winter Session : 'राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता; कोणत्याही गटाचा नाही'

Maharashtra Winter Session 2023 : नवाब मलिक यांची विधान भवनात प्रतिक्रिया; बसले मात्र सत्ताधारी बाकांवर
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Nawab Malik News : ' मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही गटातटाचा सदस्य नाही. विधिमंडळाचा आमदार या नात्याने अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी नागपुरात आलो आहे. जनतेचे प्रश्न मांडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी केले. मलिक यांनी असा विधान केलं असला तरी सभागृहात ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असलेल्या बाकांवर बसले होते.

वैद्यकीय कारणांमुळे जामिनावर मुक्तता झालेले नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (ता. 7) नागपुरात दाखल झालेत. आपल्या निवासस्थानी काही मोजक्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मलिक यांनी विधान भवनाचा परिसर गाठला.

Nawab Malik
Nagpur Winter Session : उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच 'नॉन सीरियस'! परिणय फुकेंची टोलेबाजी

विधान भवनात येताच मलिक कोणत्या गटाच्या नेत्यांसोबत संवाद साधतात, याकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाचे लक्ष लागून होते. विधान भवन परिसरात मलिक यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला. त्यानंतर त्यांनी आपण कोणत्याही गटात नाही, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत, असे स्पष्ट करीत या मुद्द्यावर अधिक भाष्य करणे टाळले.

विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपण लोकप्रतिनिधी या नात्याने सहभागी होत आहोत. त्यामुळे अन्य कोणत्याही मुद्द्यांपेक्षा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचे नवाब मलिक (Nawab malik) यांनी स्पष्ट केले.

अंडरवर्ल्डशी असलेल्या कथित संबंधांवरून नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. सुमारे एक वर्षाचा काळ तुरुंगात घालवल्यानंतर मलिक यांनी वैद्यकीय कारणाने जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता.

मात्र, न्यायालयाने हा अर्ज खारीज केल्याने मलिक यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मलिक सध्या वैद्यकीय कारणास्तव जामिनावर आहेत. अशात ते नागपुरात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना मलिक यांना भाजपने सर्वाधिक विरोध केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजप शिवसेना महायुतीच्या सरकारमध्ये सत्ता झाली म्हणून सहभागी झाला आहे. अशात मलिक हे अजित पवार गटात आल्यास त्यांना भाजपकडून विरोध होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळातील अनेकांना पडला होता.

मलिक शरद पवार (Sharad Pawar) गटात गेल्यास त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील विरोधाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे मलिक विधान भवनातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटातील बाकांवर बसतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते.

अधिवेशनाचा प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यानंतर ही बाब स्पष्ट होणार होती, परंतु गुरुवारी मलिक यांनी हे सस्पेन्स कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. सभागृहाचे कामकाजही फार काळ चाललो नाही. मात्र, सभागृहात मलिक हे सत्ताधारी गटांसाठी असलेल्या बाकांवरील शेवटच्या रांगेत बसलेले दिसले. त्यामुळे त्यांनी न बोलता काय तो संदेश दिला. अधिकृत घोषणा तेवढी शिल्लक आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Nawab Malik
Nawab Malik Support Ajit Pawar : मोठी बातमी : जामिनावर सुटलेल्या नवाब मलिकांचा अजित पवारांना पाठिंबा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com