Ambulance Tender Scam : अ‍ॅम्ब्युलन्स महाघोटाळ्याला अजितदादांची मूक संमती? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar Questions To Ajit Pawar Ambulance Tender Scam : महायुती सरकारमध्ये हजारो कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप आहे...
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSararnama
Published on
Updated on

जुई जाधव-

Ambulance Tender Scam In Maharashtra :

राज्यातील आठ हजार कोटींचा रुग्णावाहिकेचा महाघोटाळा सामोर आला आहे. सरकारनामाने सर्वात आधी याची बातमी दिली होती. महायुतीच्या या महाघोटाळ्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही आता भाष्य केले आहे. याविरोधात आवाज उठवू, असा इशारा Rohit Pawar यांनी दिला आहे.

Ajit Pawar, Rohit Pawar
Dheeraj Kumar Health Dept : IAS धीरज कुमारांनी कुणाच्या दबावाखाली 8 हजार कोटींचे टेंडर काढले?

'आरोग्य विभागात अनेक घोटाळे'

'सरकारनामा'ने अ‍ॅम्ब्युलन्स खरेदीच्या टेंडर घोटाळ्याची बातमी दिली होती. महायुतीचा हा तब्बल आठ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. वित्त विभागाशी यासंदर्भात चर्चा केली होती का? किंवा वित्त विभागाकडून यासाठी परवानगी मिळाली होती का? असे प्रश्न आमदार रोहित पवारांनी विचारले.

हा अ‍ॅम्ब्युलन्स खरेदीचा घोटाळा आहे. पण औषध घोटाळा, भरती घोटाळा असे अनेक घोटाळे हे आरोग्य खात्यात आहेत. याव्यतिरिक्त अजित पवार यांना या सगळ्याबद्दल माहिती होती का? त्यांना हे कसे पटले? असा परखड सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

केवळ सामान्य नागरिकांचे पैसे खायचे आणि घोटाळा करायचा, आम्ही याविषयी अधिवेशनात आवाज उठवू. पण आवाज उठवल्यावर राज्य सरकार ताबडतोब हे टेंडर प्रकरण रद्द करते. त्यामुळे हे असले टेंडर आधी काढायचेच कशाला? असे रोहित पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा सरकारने उद्योग सुरू केला आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचे चार हजार कोटीचे टेंडर आठ हजार कोटींपर्यंत फुगवले आहे. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, जवळच्या ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारने हे टेंडर फुगवल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारी तिजोरी लुटण्याचा सरकारचा कार्यक्रम राजरोसपणे सुरूच असून टेंडर थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅम्ब्युलन्स महाघोटाळा समोर आला आहे. आठ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. सात दिवस शॉर्ट नोटीसवर टेंडर काढण्यात आले. चार हजार कोटीच्या कामाला सरकार आठ हजार कोटी मोजणार आहे. यामध्ये मंत्र्यांच्या नातेवाईकांना काम मिळाले आहे. सरकारमधील काही नेत्यांचे लाड पुरविणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा आटापिटा सरकारनेच केला आहे. गरीब रुग्णांसाठी असलेल्या या योजनेच्या टेंडरमध्ये आठ हजार कोटींचा महाघोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सरकार अशी कामे करत आहे, असे आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केले.

edited by sachin fulpagare

R...

Ajit Pawar, Rohit Pawar
Ambulance Tender Scam : राज्यात आठ हजार कोटींचा टेंडर घोटाळा! सूत्रधार कोण? IAS अधिकारी रडारवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com