Rohit Pawar On Protest: रोहित पवारांचे अजितदादांना अवघ्या काही मिनिटांत उत्तर : ‘दादा, धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख’

Rohit Pawar Replies Ajit Pawar: राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला.
Ajit Pawar-Rohit Pawar
Ajit Pawar-Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या मुद्यावर उपोषणाला बसलेले आमदार रोहित पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात खडे बोल सुनावले. आमदार रोहित पवार यांनीही अजितदादांना अवघ्या काही मिनिटांत उत्तर दिले. अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. त्यामुळे आता या कामात तुम्हीच लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती आमदार पवार यांनी केली आहे. (Rohit Pawar's reply to Ajitdada in just a few minutes)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा विषय हा आजचा नाही, तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला.

Ajit Pawar-Rohit Pawar
Ajit Pawar In Assembly Session: अजितदादांनी रोहित पवारांचे कान टोचले; ‘अशा प्रकारे उपोषणाला बसणे उचित नाही’

राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझी आपणास विनंती आहे की, उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला, तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे. या ट्विटसोबत कर्जत-जामखेडकरांचं एकच मिशन; मंजूर #MIDC चं हवं नोटिफिकेशन! अशी घोषणाही देण्यात आलेली आहे.

Ajit Pawar-Rohit Pawar
Indapur Politic's : भरणेंचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सुखद धक्का; इंदापुरातील ५० कोटींच्या कामांच्या भूमिपूजनाचा दिला मान

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे विधान भवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसले आहेत. त्याबाबतचा मुद्दा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांना खडे बोल सुनावले होते.

Ajit Pawar-Rohit Pawar
Dhananjay Munde News : कृषिमंत्री होताच धनंजय मुंडे पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर....थेट सचिवांना लावला फोन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरात म्हटले होते की, आमदार रोहित पवार यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या एमआयडीसीसंदर्भातील पत्राची एक प्रत माझ्याकडेही आहे. उद्योगमंत्री सामंत यांनी १ जुलै २०२३ रोजी पत्र दिलेले आहे. त्यात उद्योगमंत्र्यांनी रोहित पवार यांना उत्तर देत म्हटलेले आहे की, आपले २२ जूनचे पत्र मिळाले. कर्जतमध्ये एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांच्या समवेत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. उपोषणाला बसण्यासाठीचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा, असे आवाहन मंत्री सामंत यांनी रोहित पवार यांना केलेले आहे.

Ajit Pawar-Rohit Pawar
Balasaheb Thorat News : हलगीचा कडकडाट अन्‌ ढोल-ताशांच्या गजरातील मिरवणूक…थोरातांनी २०२४ चे रणशिंग फुंकले!

उद्योगमंत्री पत्र देतात. अजून अधिवेशन संपलेलं नाही. अधिवेशन सुरू होऊन एकच आठवडा झालेला आहे. आजच दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. लोकप्रतिनिधींनीही निवेदन दिल्यानंतर एमआयडीसीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. अशा प्रकारे उपोषणाला बसणे उचित नाही. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com