Indapur Politic's : भरणेंचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सुखद धक्का; इंदापुरातील ५० कोटींच्या कामांच्या भूमिपूजनाचा दिला मान

काही दिवसांपूर्वी निधी कोणी मंजूर करून आणला, यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवाद रंगला होता.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama

Indapur News : शिवसेना-भाजप सरकारमध्ये अर्थमंत्री बनताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवरील स्थगिती उठवली. त्यात इंदापूर तालुक्यातील ५० कोटी रुपयांच्या कामांचा समावेश होता. इंदापूरमध्ये माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यात कायम श्रेयवाद रंगलेला असतो. पण, भरणे यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सुखद धक्का दिला. तालुक्यातील ५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्याचा मान भरणे यांनी त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना दिला. (Bhumi Pujan of works worth 50 crores in Indapur by activists)

इंदापूरचे (Indapur) राजकारण हे भाजप नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांच्यात तराजूच्या काट्याप्रमाणे चालते. निवडणुकीत काही हजार किंवा शेकड्याच्या मताने जय-पराजय ठरलेला असतो. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीकडून श्रेयवादाचा लढाई जोरात सुरू असते. काही दिवसांपूर्वी निधी कोणी मंजूर करून आणला, यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत (NCP) श्रेयवाद रंगला होता. त्या पार्श्वभूमीवर भरणे यांनी भूमिपूजनाची कार्यकर्त्यांना दिलेली संधी वेगळेपण दर्शविणारी आहे.

Dattatray Bharane
Dhananjay Munde News : कृषिमंत्री होताच धनंजय मुंडे पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर....थेट सचिवांना लावला फोन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील जलसंधारणाच्या विभागाच्या सुमारे ५० कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती उठविण्यामध्ये राज्यमंत्री भरणे यांनी यश मिळवले. त्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. २२) एकाच दिवशी ठेवण्यात आले होते. संबंधित गावांच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आमदार भरणे यांच्याकडून दोन दिवसांपूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कार्यकर्त्यांनी फलक लावून भरणे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.

Dattatray Bharane
Sunday Special : खासदार श्रीनिवास पाटलांच्या नातवानं आजोबांचं नाव काढलं; पटकावला 'हा' मानाचा पुरस्कार

माजी राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते अनेक गावांतील कामांचे भूमिपूजन होणार होतो. सगळीकडे जवळपास सकाळच्या दहाची वेळ देण्यात आलेली होती. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात होते. भरणे आपल्या गावात कधी येणार, कधी भूमिपूजन करणार, याची चर्चा गावोगावी होती. पण, नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी सातपासून भरणेवाडीत भरणेंचा जनात दरबार भरला होता. आलेल्या लोकांच्या अडचणी सोडविण्यात आमदार गुंतलेले.

कार्यक्रमाची वेळ जवळ येऊ लागली तशी कार्यकर्त्यांची चुळबूळ वाढू लागली. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ यांनी थेट भरणे यांना फोन लावला. ‘कार्यक्रमाची वेळ जवळ आली आहे. मामा कधी येणार, असे कार्यकर्ते विचारपूस करत आहे,’ असे त्यांनी भरणेंना सांगितले.

Dattatray Bharane
Balasaheb Thorat News : हलगीचा कडकडाट अन्‌ ढोल-ताशांच्या गजरातील मिरवणूक…थोरातांनी २०२४ चे रणशिंग फुंकले!

थोड्या वेळेनंतर भरणे यांनी स्वीय सहाय्यक अनिकेत जाधव यांना गावोगावच्या कार्यकर्त्यांना निरोप द्यायला सांगितला. आपण केलेल्याला कामाचा कसलाही गाजावाजा करायची मला हौस नाही. सामान्य कार्यकर्ताच माझा प्रसिध्दीमाध्यम असून मी आमदार म्हणजेच तुम्ही कार्यकर्ते आमदार आहात. त्यामुळे माझ्या येण्याची वाट न बघता आपापल्या गावातील भूमिपूजनचा कार्यक्रम उरकून घ्या, असा निरोप पाठवला. निरोप मिळताच सामान्य कार्यकर्त्यांच्या हस्ते विविध गावांत विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. भरणे यांच्या अनपेक्षितपणे सुखद धक्क्यामुळे कार्यकर्त्यांना भूमिपूजनाची संधी मिळाली.

Dattatray Bharane
Ajit Pawar Vs Jitendra Awhad : अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांवरील राग अजूनही जाईना...

इंदापूर तालुक्यातील काळेवाडी, पळसदेव, भावडी आणि न्हावी या ठिकाणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्वतः उपस्थित राहून भूमिपूजन केले. उर्वरित ठिकाणचे भूमिपूजन इतर कार्यकर्त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com