Sanjay Raut : "नेहरूंना ED ची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल"

"पीएम केअर फंडापासून भाजपच्या खजिन्यात जमा होणाऱ्या शेकडो कोटींच्या रकमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेच आहे. …पण नेहरूंचा ‘हेराल्ड’ गुन्हेगार ठरला!
national herald case
national herald case
Published on
Updated on

मुंबई : ईडीने (ed) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (gandhi rahul) यांना नॅशनल हेराल्ड (national herald case) या प्रकरणात नोटीस बजावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नॅशनल हेराल्ड प्रकरण समोर आलं आहे.

सोनिया (sonia gandhi) आणि राहुल गांधी यांना ईडीनं नोटीस पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सामना'तून मोदी सरकारवर तोफ डागली आहे.

"सोनिया गांधी व राहुल गांधींवर याप्रकरणी ठपका ठेवला म्हणून ‘नॅशनल हेराल्ड’ काँग्रेस जनांना माहिती झाले, पण नॅशनल हेराल्ड हे एकेकाळी काँग्रेसचे सामर्थ्य होते. नेहरूंचा आत्माच त्यात गुंतला होता. नेहरू हे निर्भीड होते. कोणत्याही टीकेला ते घाबरत नसत. ‘नॅशनल हेराल्ड’ने त्याच स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार केला. त्याचे अनेक किस्से आहेत. नेहरू म्हणजे लोभस व्यक्तिमत्त्व होते. हल्ली राज्यकर्ते व पत्रकार यांचे तसे कमी जमते, परंतु नेहरूंनीच यासंबंधी काय सांगितले आहे ते आज दिले तर ते उचित ठरावे." असे राऊतांनी 'रोखठोक'मध्ये म्हटलं आहे. मोदी-शाह यांना अप्रत्यक्षपणे राजकारणातील व्यापारी असे राऊतांनी म्हटलं आहे.

national herald case
Rajyasabha Election : मनसेचे मत कुणाला ? ; राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं..

"नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार दाखल केली. प्रकरण न्यायालयात गेलं. अरुण जेटली अर्थमंत्री असताना चौकशी झाली. या प्रकरणात दम नाही असं त्यांचं मत होतं व संपूर्ण प्रकरण बंद केलं. हे सर्व प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेतले पाहिजे. 1 एप्रिल 2008 रोजी हे वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडे होती." असे राऊत म्हणाले.

"पीएम केअर फंडापासून भाजपच्या खजिन्यात जमा होणाऱ्या शेकडो कोटींच्या रकमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेच आहे. …पण नेहरूंचा ‘हेराल्ड’ गुन्हेगार ठरला! पंडित नेहरूंना ई.डी., सीबीआयची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल!" अशी टीका राऊतांनी केली आहे.

'रोखठोक'मध्ये संजय राऊत म्हणतात..

  • "नॅशनल हेराल्ड' प्रकरणात कर्ज फेडण्यासाठी व्यवहार झाला. त्यास गैरव्यवहार म्हणता येणार नाही.

  • या सर्व प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

  • काय सांगावे, ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात एखादे समन्स नेहरूंच्या नावाने त्यांच्या स्मारकावरही चिकटवले जाईल.

  • गांधी, नेहरू, पटेल यांच्या स्वातंत्र्यसंग्रामास आर्थिक बळ दिले म्हणून बिर्ला व बजाज यांच्या नावानेही समन्स काढले जाईल."

  • "पंडित नेहरूंची ही संस्था टिकावी म्हणून काँग्रेसने काही उलाढाली केल्या असतील. अशा उलाढाली संघ परिवारातील अनेक संस्था करतात.

  • पीएम केअर फंडापासून भाजपच्या खजिन्यात जमा होणाऱ्या शेकडो कोटींच्या रकमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेच आहे.

  • नेहरूंचा ‘हेराल्ड’ गुन्हेगार ठरला! पंडित नेहरूंना ई.डी., सीबीआयची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल!"

  • "नेहरूंनी सुरू केलेल्या नॅशनल हेराल्डचे राजकीय महत्त्व कधीच संपले आहे, पण हेराल्डचे राजकारण मात्र सुरू आहे.

  • नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र पंडित नेहरूंनी सुरू केले होते. इंग्रजांना देशातून हाकलून देणं हा या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश होता.

  • 1937 साली नेहरूंनी हे पत्र सुरू केलं. तेव्हा स्वतः नेहरू, महात्मा गांधी व सरदार पटेल हे या वृत्तपत्राचे मुख्य आधारस्तंभ होते.

  • स्वातंत्र्य लढ्याचे जहाल मुखपत्र म्हणून त्या काळात हेराल्ड लोकप्रिय होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com