बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची RSS ला अडचण : शिवसेना-भाजपमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता

Balasaheb Thackeray | Shivaji Park memorial | RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महापालिकेला पत्र
Balasaheb Thackeray News, Mohan Bhagwat News, Shivsena Vs BJP News
Balasaheb Thackeray News, Mohan Bhagwat News, Shivsena Vs BJP News Sarkarnama

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे शिवाजी पार्क (Shivaji Park) स्मृतिस्थळ वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या स्मृतिस्थळाच्या जागेजवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपला दावा सांगितला आहे. महापालिकेच्या दादर विभागाला पत्र लिहून संघाने हा दावा केला आहे. तसेच या स्मृतिस्थळामुळे उपक्रम भरवण्यास अडचण येत असल्याची तक्रारही या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच टोकाचा संघर्ष असलेल्या भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shivsene) आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. (Shivsena Vs BJP News)

काय म्हटले आहे पत्रात?

मुंबई महापालिकेने (BMC) १९६७ सालापासून स्मृतिस्थळाजवळील १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दैनंदिन शाखा भरवण्यासाठी VLT तत्वावर भाड्याने दिला आहे. २००७ पर्यंत या भूखंडाचे नियमीत भाडे भरले आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) जी/ उत्तर विभाग यांच्या निर्देशांनुसार जागेचे आरेखन (मोजणी) करायचे असल्याने २००८ पासून या जागेचे भाडे भरलेले नाही. पण आता या जागेचे भाडे भरण्यास आम्ही तयार आहे. तसेच ०१.०४.१९६७ पासून वर्ष २०२१-२२ पर्यंतचा मालमत्ता कर देखील भरला आहे.

मात्र आता या भूखंडाजवळ स्मृतिस्थळाची व्याप्ती वाढत असल्यामुळे आम्हाला आमच्या ताब्यातील VLT तत्वावरील भूखंडावर आमचे उपक्रम राबविण्यास अडचणी येत आहेत. तसेच स्मृतिस्थळामुळे जागेचे आरेखन करणे जिकीरीचे होईल असे वाटते. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता सदर जागेचे थकीत भूभाडे (VLT RENT) तातडीने स्वीकारण्यात यावे. याशिवाय स्मृती स्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना-नानी पार्क जवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा, अशी विनंती देखील या पत्रातून करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com