Nilam Gorhe : महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये का केली जातायेत? नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं

राज्यातील राजकीय नेत्यांकडून महापुरुषांबाबत सातत्याने आक्षेपार्ह, अवमानकारक वक्तव्ये होत आहे. यावरुन राज्यभरात वातावरण ढवळून निघाले आहे.
Dr. Nilam Gorhe
Dr. Nilam GorheSarkarnama
Published on
Updated on

Nilam Gorhe News : जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयश येत असल्यामुळे मुळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी महापुरुषांचा अपमान करणारे वक्तव्य हत्यार म्हणून केली जात आहेत का, अशी शंका विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील राजकीय नेत्यांकडून महापुरुषांबाबत सातत्याने आक्षेपार्ह, अवमानकारक वक्तव्ये होत आहे. यावरुन राज्यभरात वातावरण ढवळून निघाले आहे. या बाबत नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महापुरुषांबाबत चुकीचे वक्तव्ये होत आहे, सीमाप्रश्नाबाबतही तीच तीच वक्तव्ये होत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विटर हॅक झाल्याचं सांगितलं जातं, मात्र हा खुलासा अपुरा आणि निराधार वाटतो. कुठलाही कायदा करण्यापेक्षा मनात आदर असला पाहिजे, मात्र जे मनात आहे तेच तोंडात येत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. काहीवेळा जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयश येत असल्यामुळे महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशी वक्तव्ये हत्यारे म्हणून केली जात आहेत का, अशी शंका नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

Dr. Nilam Gorhe
Manikrao Kokate news; सिन्नरच्या निवडणुकांत कोकाटे समर्थक जोमात?

गेले दोन वर्षे कोविड मुळं नागपूरात हिवाळी अधिवेशन होऊ शकलं नाही, त्यामुळं या वेळच्या अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील प्रश्न सुटावे अशी अपेक्षा आहे, अशा शब्दांत विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन आठवड्याचं जरी अधिवेशन असलं तरी कामकाज भरपूर आहे, अधिवेशनाचं स्वरूप ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबतही भाष्य केलं आहे. 'मोर्चा ज्या हेतूने होतोय. माफी मागितली तरी महापुरुषांच्या बाबत होणारे वक्तव्य थांबणार आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सामान्य माणसाला अपेक्षा आहे की संवेदनशील पद्धतीने हा प्रश्न सोडविला गेला पाहिजे. महापुरुषांचा अपमान होणार नाही असं वक्तव्य करा, असं जर सांगावं लागत असेल तर यापेक्षा दुसरी वैचारिक दिवाळखोरी नाही, असा टोलाही गोऱ्हे यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com