मोदींची नक्कल होताच फडणवीस 'तडफनीस' झाले ; रुपाली पाटलांचा टोला

शिवाजी महाराजांची विटंबना झाली तरी बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस साहेब , सभागृहात मोदींची नक्कल होताच “तडफनीस” झाले’
Rupali Thombre Patil, Devendra Fadanvis

Rupali Thombre Patil, Devendra Fadanvis

sarkarnama

मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशान बुधवारी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी अधिवेशनात गोंधळ घातला होता.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला होता. भास्कर जाधव यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी टि्वट करीत फडणवीसांना चांगलेच सुनावले आहे. आपल्या टि्वटमध्ये रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात, ''कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली तरी बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस साहेब , आज सभागृहात मोदींची नक्कल होताच “तडफनीस” झाले’, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच शिवप्रेमी दूधखुळा नाही, तुमची निष्ठा कुठे आहे? महाराष्ट्रा समोर उघडे पडले आहे,''

अधिवेशनात चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १५ लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा फडणवीसांनी, नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाही, असा दावा केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांच्या शैलीत त्यांची वाक्य बोलून दाखवली. हे पाहून देवेंद्र फडणवीस संतापले. 'देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे, हे योग्य नव्हे. सभागृहात अशाप्रकारचा पायंडा पडता कामा नये,'' असे फडणवीस म्हणाले.

उर्जामंत्री नितीन राऊत हे एका प्रश्नावर उत्तर देत असताना या सगळ्या वादाची सुरुवात झाली. यावेळी करोनामुळे आपल्याला १०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची पूर्ती करता आली नाही, असे सांगितले. याचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देण्याच्या आश्वासनाचा उल्लेख राऊत यांनी केला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाही, असा दावा केला.

<div class="paragraphs"><p>Rupali Thombre Patil,&nbsp;Devendra Fadanvis</p></div>
अनिल देशमुखांची पुन्हा चैाकशी होणार ; क्लीन चीट अहवाल लीक

त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांची नक्कल करत काही वाक्यं बोलून दाखवली. हे पाहून देवेंद्र फडणवीस यांच्या संतापाचा पारा चढला. सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे, हे योग्य नव्हे, असे फडणवीस यांनी म्हटले.

''गेल्या अधिवेशनात मी तालिका अध्यक्ष असताना भाजपचे १२ आमदार निलंबित झाले होते. त्याची सल भाजपच्या मनात अजूनही आहे. माझ्याविरुद्ध त्यांना काहीच कारण मिळत नव्हते. त्यामुळे आज माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी पंतप्रधानांचा अपमान केला, असे वातावरण निर्माण करण्यात आले आणि मला माफी मागायला लावण्यात आली, असे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com