Rupali Patil Thombare On NCP Dispute :
Rupali Patil Thombare On NCP Dispute : Sarkarnama

Rupali Patil Thombare News : रूपाली ठोंबरे पाटील कुणाच्या गटात? 'राष्ट्रवादीतील वाद मिटेल'; व्यक्त केला विश्वास!

Rupali Patil Thombare On NCP Dispute : "दोन्ही बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना.."
Published on

Mumbai News : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचा गट शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. यावर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादीतील वाद मिटतील अशी भूमिका व्यक्त केली आहे. (Marathi Latest News)

रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, "मी इथे अजित पवारांना समर्थन देण्यासाठी आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. अजित पवार यांनी मित्रपक्षांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पक्षांतर्गत जो काही विषय आहे ते शरद पवार आणि अजित पवार सोडवतील. अजित पवार यांनी जो काही सरकारला पाठिंबा दिला आहे, ते कदाचित शरद पवारांना मान्य होईल. अजित पवार हे काम करणारं नेतृत्व आहे. जो काही अंतर्गत नाराजी तो मिटेल, असा विश्वास रूपाली पाटील यांनी व्यक्त केला.

Rupali Patil Thombare On NCP Dispute :
Rohit Pawar On Lok Sabha : मध्यावधी निवडणुकांबाबत पवाराचं मोठे विधान ; म्हणाले, "डिसेंबरमध्ये.."

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन -

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आज मुंबईत बैठक आहे. दोन्ही गट बैठकांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या दोन्ही बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना झाले आहे. या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांनी अंधारात ठेवून काही आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याचा, दिशाभूल केल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कोणासोबत किती संख्याबळ याचा नेमका खुलासा आजच्या बैठकांमध्ये होण्याची शक्यता आहे.

Rupali Patil Thombare On NCP Dispute :
IAS Ananya Singh : प्रचंड मेहनतीच्या बळावर अनन्या सिंग बनल्या वयाच्या 22व्या वर्षी 'आयएएस' अधिकारी

‘आम्हीच खरे राष्ट्रवादी’ असा दावा करणारे शरद पवारअजित पवार बुधवारी मुंबईत स्वतंत्र बैठकांद्वारे शक्तिप्रदर्शन करीत आहेत. भाजपला पाठिंबा देण्याबाबत ४० आमदारांच्या सह्यांचे आपल्याकडे पत्र आहे. त्यामुळे पक्ष व चिन्ह आमच्याकडेच असा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर अनेक आमदार आमच्याकडे परत येत असल्याचा दाव शरद पवार गटाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com