मोदींच्या 'ऑपरेशन गंगा'वर सुषमा स्वराज नीतीचा प्रभाव !

स्वराज यांनी येमेन युध्दसंकटाच्या काळात तेथील हजारो भारतीयाना माघारी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे मित्र, सौदी अरेबियाच्या राजांबरोबर चर्चा करण्याची विनंती केली होती.
 Operation Ganga
Operation Ganga sarkarnama

नवी दिल्ली : युक्रेन-रशियाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत रोमानिया (Romania) आणि मोल्दोव्हा (Moldova) येथून सुमारे 5,000 विद्यार्थ्यांना बाहेर काढले जाणार आहे. युक्रेनमध्ये सुमारे 8,000 भारतीय, प्रामुख्याने विद्यार्थी अडकले आहेत. दिल्लीतील विमानातून 208 नागरिकांना उतरवण्यात आले.

युक्रेनमधील आणखी २२० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान आज दिल्ली विमानतळावर उतरले यात १२ मराठी मुले आहेत. रोमानिया, हंगेरी व युक्रेनच्या आसपासच्या देशांतून ८ मार्चपर्यंत वायूसेना व प्रवासी विमान कंपन्यच्या आणखी किमान ३१ विमानांतून ८ मार्चपर्यंत आणखी ६३०० विद्यार्थी भारतात परत येतील असे विदेश मंत्रालयाने आज स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi)सरकारने वेगवान केलेल्या 'ऑपरेशन गंगा' या भारताच्या मोहीमेची आखणी ज्या प्रकारे केली आहे ती पाहता माजी विदेशमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचा त्यावर मोठा प्रभाव असल्याचे दिसते. स्वराज यांनी येमेन युध्दसंकटाच्या काळात तेथील हजारो भारतीयाना माघारी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे मित्र, सौदी अरेबियाच्या राजांबरोबर चर्चा करण्याची विनंती केली होती. मोदी यांची ती शिष्टाई यशस्वी होऊन केवळ ७ दिवसांत तब्बल ७ हजार देशीविदेशी नागरिकांना भारतात सुखरूप आणण्याची मोहीम स्वराज यांनी फत्ते केली होती.

 Operation Ganga
राणें पिता-पुत्रावर अटकेची टांगती तलवार

मोदी यांनी ताज्या संकटात प्रथम आपले मित्र, रशियाचे अध्यक्ष व्हादीमीर पुतीन व नंतर युक्रेनचे अध्यक्ष ज्वेलेन्स्की यांच्याशी दीर्घ बातचीत केली त्यावेळी त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांची लवकरात लवकर व सुखरूप सुटका हाच विषय केंद्रस्थानी ठेवला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन गंगा‘ मोहीमेला विलक्षण गती दिली.

भारताने ४ वरिष्ठ मंत्र्यांना युक्रेनच्या नजिकच्या देशांत पाठविले. परराष्ट्रमंत्री ए जयशंकर यांनी दिल्लीतून मोहीमेचे संचालन करावे असे निर्देश मोदी यांनी दिले. स्वराज यांनी थेट अशीच मोहीम आखून ५ हजार भारतीयांची मुक्तता केली त्याच धर्तीवर पण विस्तारित स्वरूपात मोदींनी युक्रेन संकटातील ‘ऑपरेशन गंगा‘ ची आखणी केल्याचे स्पष्ट आहे. ऑपरेशन गंगाच्या सध्याच्या मोहीमेवर स्वराज यांनी त्या वेळी पार पडलेल्या मोहीमेची छाप असल्याचे स्पष्ट दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com