Shiv Sena : २५ वर्षे हिंदुत्वाच्या नावाने नांदलो, भाजपने हिंदुत्वाचा असा कोणता दिवा पेटवला !

Shiv Sena : 'सामना' अग्रलेखातूनही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढून जिंकणार असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी युतीची घोषणा केली आहे. शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी दोन दिवसापूर्वी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडबाबत लढवय्या सहकारी असा उल्लेख केला.

"फक्त महाराष्ट्रतच नव्हे तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. त्यामुळे प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं. आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन मोठा इतिहास घडवू ,"असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.आता 'सामना' अग्रलेखातूनही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढून जिंकणार असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

"शिवसेनेप्रमाणेच संभाजी ब्रिगेडही महाराष्ट्रातील सळसळत्या रक्ताची संघटना आहे. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या सामाजिक, राजकीय, लोककल्याणकारी आणि महाराष्ट्र धर्माशी इमान राखणाऱ्या संभाजी ब्रिगेडने कठीण काळात शिवसेनेस प्रेमाचे आलिंगन द्यावे यापेक्षा मोठा राजधर्म कोणता असेल? महाराष्ट्र हित रक्षणासाठी, राज्याच्या स्वाभिमान रक्षणासाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणे ही राज्यातील मोठय़ा परिवर्तनाची चाहुल आहे," असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

 Uddhav Thackeray
Aaditya Thackeray यांच्या नावाने खेळाडूला गंडा घालण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

"संभाजी ब्रिगेडचे श्री. पुरुषोत्तम खेडेकर हे महाराष्ट्र धर्म मानतात. ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक विचारांचे पाईक आहेत. प्रबोधनकार हिंदुत्वाचे झुंजार शिपाईगडी होतेच. त्यामुळे जास्तीत जास्त एकमतावर दोन लढाऊ संघटनांची ‘युती’ झाली आहे, असे समजा! नाहीतरी ज्या भाजपबरोबर आम्ही पंचवीस वर्षे हिंदुत्वाच्या नावाने नांदलो, त्यांनी तरी हिंदुत्वाचा असा कोणता दिवा पेटवला,?" असा प्रश्न अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे की..

  • छत्रपती संभाजींच्या नावानेही दिल्लीच्या बादशाहीचा थरकाप होत असे. ते खरे धर्मवीर होते. त्या धर्मवीराने धर्मरक्षणासाठी, महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले.

  • छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याच्या ठिणग्यांतून महाराष्ट्रात स्वाभिमान आणि क्रांतीचा वणवा पेटला. महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला.

  • आता संभाजी ब्रिगेड आणि आम्ही त्याच महाराष्ट्र स्वाभिमानाच्या क्रांतीचा वणवा पेटविण्यासाठी एकत्र आलो आहोत.

  • आज महाराष्ट्र स्वाभिमान्यांची बरीचशी शक्ती धर्म आणि जात यांच्या नावाने शिमगा करीत, एकमेकाला डिवचण्यात, हल्ले करण्यात खर्ची पडत आहे.

  • त्यातून एकमेकांचेच बळ कमी होत आहे आणि याचाच फायदा भाजपसारखे लोक देशभर घेतात, हे लक्षात घ्यायला हवे.

  • आम्हीही जिंकू. नक्कीच जिंकू! महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com