Suhas kande VS Dada Bhuse : कांदे-भुसे यांच्यातील विस्तव जाणार का ? ;कांदे-मुख्यमंत्री यांच्यात खलबते

suhas kande : मी एकनाथ संभाजी शिंदे या व्यक्तीवर प्रेम करणारा आहे.
Suhas kande VS Dada Bhuse
Suhas kande VS Dada Bhuse sarkarnama

suhas kande : महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी सत्तानाट्य होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरही काही आमदारांमधील नाराजी कायम आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत पहित्यांदा सुरतला जाणारे आमदार सुहास कांदे हे होते.पण सध्या सुहास कांदे हे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराज आहेत. याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

“मला पक्षाच्या बैठकांना बोलवलं जात नाही. पक्षाचे कार्यालय कुठे आहे, याचीही माहिती नाही. त्यामुळे बोलवले नाहीच तर जाऊ कसा. तसेच, नव्या पक्षनिवडींमुळे पक्षाची वाटचाल थांबली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गटातील नगरसेवक आणि सरपंच यांचे प्रवेश या नेमणूकांमुळे थांबली आहेत. मी एकनाथ संभाजी शिंदे या व्यक्तीवर प्रेम करणारा आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारा नाही,” असेही सुहास कांदे यांनी सांगितलं आहे.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते कांदे यांना बैठकांना बोलवत नाहीत.त्यांना न विचारता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, अशी खंत सुहास कांदे यांनी नुकतीच माध्यमांसमोर मांडली आहे.

Suhas kande VS Dada Bhuse
Gujarat Elections 2022 : आपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा ; 'हे' असतील उमेदवार

सुहास कांदे-दादा भुसे याच्यातील विस्तव जात नसल्याने शिंदे गटात सारेकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. कांदे-भुसे यांच्या नाराजीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

काल (मंगळवारी) सुहास कांदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली मिळाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पालकमंत्री दादा भुसे हे आपल्याला बैठकीला बोलवित नसल्याची तक्रार कांदे यांनी केली असल्याची समजते. यावर मुख्यमंत्री शिंदे आता दादा भुसेंना काय समज देतात, कांदे-भुसे यांच्यातील वाद मिटणार काय, हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com