आमच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा आमची दादागिरी दिसली नाही का?

सचिन अहिर म्हणतात, मुंबईमध्ये आम्ही दादागिरीची भाषा करतो, ती प्रेमाने आणि आदराने करतो.
 Sachin Ahir
Sachin Ahirsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच (shivsena) असल्याचे म्हटले होते. तसेच आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणेही त्यांना मुश्किल होईल, असा इशारा राऊत यांनी दिला होता. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका करत राऊत यांचे धमक्या देण्याचे दिवस आता संपले आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी राणे यांना जोरदार प्रत्युतर दिले आहे.

 Sachin Ahir
घराणेशाहीचा ढोल कधीपर्यंत बडवत राहणार ; मलिकांचा भाजपला सवाल

अहिर म्हणाले, मुंबईमध्ये आम्ही दादागिरीची भाषा करतो, ती प्रेमाने आणि आदराने करतो. जसा मोठा भाऊ, त्याला दादा म्हणतात, मुंबईत ती भाषा चालते. लोकांच्या जीवावर, मतावरची दादागिरी आहे. मुंबईच्या विकासासाठीची दादागिरी आहे. दोन बटन उघडून ही दादागिरी नाही, असा टोला त्यांनी राणे यांना लगावला. मराठी माणसाचा कौल आम्हाला मिळतो, आणि आता तर इतर भाषिकांचा कौल आम्हाला मिळत आहे. त्यातून काही लोकांच्या पोटात गोळा उठतो, त्यातून ही प्रतिक्रिया आली आहे. गेल्या आठवड्यात त्यांची भाषा बदलत होती. आज परत बदल्ली, असा खोचक टोला अहिर यांनी लगावला.

आम्ही मुंबईत तेजीने विकास करतो, त्यातून आमचा आकडा आणखी वाढणार आहे, असा दावाही अहिर यांनी केला. मोठा भाऊ कोण हे समजायला त्यांना ५ वर्ष लागली. आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते, तेव्हा आमची दादागिरी त्यांना समजली नाही का असा सवाल त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला. यावेळी अहिर यांना संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता ते म्हणाले, आमचा न्याय पालिकेवर विश्वास आहे. न्यायदेवतेकडे आम्ही जाऊ तेव्हा आम्हाला न्याय मिळेल. त्यातुनही कोणी काही करण्याचा प्रयत्न करेल तर ही शिवसेना आहे, असा इशाराही अहिर यांनी दिला.

 Sachin Ahir
शिवसेनेत माझी 'लेव्हल' दानवेंपेक्षा वरचढ ; खैरेंनी डिवचलं

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना अहिर म्हणाले, बोलायला कोणी रोखलेले नाही. कारण देशात लोकशाही आहे. मात्र, कोणी बोलावे आणि कोणावर बोलावे याला काहीतरी मर्यादा असायला हवी. त्यांनी लक्षात ठेवायला हवे, आपण कोणा बद्दल बोलतो ते त्यांना जनतेने तिथे बसवले आहे. देशातील पहिल्या टॅाप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये असण्याचा मान त्यांना मिळाला आहे. याचा आपल्याला अभिमान असायला हवा. मात्र, काहींना बोलायची सवय आहे, त्यांना बोलुदेत लोकशाही आहे, असेही अहिर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com