Manikrao Kokate : सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी मोठा निर्णय!

Sachin Tendulkar Manikrao Kokate : सचिन तेंडुलकर यांनी एका कार्यक्रमात महिला खेळांडूसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला क्रीडामंत्री कोकाटे यांनी प्रतिसाद दिला आहे.
Sachin Tendulkar Manikrao Kokate
Sachin Tendulkar Manikrao Kokatesarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी महिला खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरणाची गरज व्यक्त केल्यानंतर, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी या मागणीला तातडीने प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला खेळाडूंचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना सन्मानजनक व सुरक्षित सुविधा पुरवणे, यासाठी क्रीडा विभागाने पुढाकार घेतला आहे. यात जिल्हा, तालुका आणि स्थानिक पातळीवरील सर्व क्रीडांगणांवर चेंजिंग रूमची सुविधा प्राधान्याने उभारली जाणार आहे.

चेंजिंग रूममध्ये स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधांसोबतच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जाईल, तसेच महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. दादर क्लबच्या उद्घाटनावेळी सचिन तेंडुलकर यांनी महिला खेळाडूंना सुविधा पुरवण्याविषयी मागणी केली होती.

Sachin Tendulkar Manikrao Kokate
Ajit Pawar : 'पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुण्याची सूत्रे माझ्या हाती दिल्यास...', अजितदादांकडून स्वबळावर निवडणुका लढण्याचे संकेत; नेमकं काय म्हणाले?

क्रीडामंत्री कोकाटे म्हणाले, सर्व खेळांच्या मैदानावर चेंजिंग रूमची सुविधा निर्माण करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग आणि आत्मविश्वास वाढेल. तसेच, केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ, बेटी को खिलाओ’ या उपक्रमाला प्रत्यक्ष गती मिळेल. प्रत्येक मुलगी आता अभिमानाने मैदानात उतरेल.

Sachin Tendulkar Manikrao Kokate
OBC Reservation : 'नागपुरातील मोर्चा ओबीसींचा नव्हे काँग्रेसचा...' मनोज जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'राहुल गांधींच्या सांगण्यावरून...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com