Ajit Pawar : 'पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुण्याची सूत्रे माझ्या हाती दिल्यास...', अजितदादांकडून स्वबळावर निवडणुका लढण्याचे संकेत; नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar on Pune Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विविध मतदारसंघात गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. अशातच काल त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी उमेदवारीबाबत महत्त्वाचे संकेत दिलेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 Oct : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विविध मतदारसंघात गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. अशातच काल त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला.

यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून आयोजित जनसंवाद व राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमात त्यांनी उमेदवारीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. शिवाय यावेळी त्यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावरच लढविणार असल्याचे संकेत दिले.

त्यांच्या वक्तव्यामुळे आता काही इच्छिक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर काही उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अजित पवारांनी खडकवासला मतदारसंघातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.

Ajit Pawar
OBC Reservation : 'नागपुरातील मोर्चा ओबीसींचा नव्हे काँग्रेसचा...' मनोज जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'राहुल गांधींच्या सांगण्यावरून...'

यावेळी त्यांनी अनेक नागरिकांची निवेदनेही घेतली. तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथील अविनाश लगड यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड प्रमाणे पुणे शहराची सूत्रे माझ्या हाती दिल्यास पुण्याचाही सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न राहील, मी आधी पिंपरी-चिंचवडचा विकास करून दाखविला.

मी आधी काम करतो आणि मग त्याच रस्त्याने चालायचं सांगतो, शिवशाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा आहे. मी बेरजेचे राजकारण करतो, असं म्हणत त्यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावरच लढविण्याचे संकेत दिले.

Ajit Pawar
Congress MLA betting scam : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराचा ऑनलाईन बेटिंग प्रकरणात 2000 कोटींचा व्यवहार; परदेशापर्यंत नेटवर्क

शिवाय जुन्या-नव्यांचा वाद न करता, जनमानसात चांगली प्रतिमा असलेले, सर्व जाती-धर्मांच्या गटांना बरोबर घेऊन जाणारे आणि समाजात मिसळून राहणारे अशा व्यक्तींनाच प्रतिनिधित्वाची संधी दिली जाईल, असंही अजितदादांनी यावेळी त्यांच्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरही उपस्थित होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com