Anil Parab's Resort
Anil Parab's ResortSarkarnama

Sai Resort : अनिल परबांचे पाय आणखी खोलात ? ; दोन महिन्यात चौथा गुन्हा दाखल

Sai Resort News : दापोली तालुक्यातील मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणी ही सुनावणी सुरू आहे.

Sai Resort News : ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब व त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साई रिसॉर्ट प्रकरणात गेल्या दोन महिन्यात हा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. समुद्राच्या जागेवर भरणी, स्वागत कक्ष बांधणे, सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यासाठी अनिल परब, सदानंद कदमचा विरोधात, दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी टि्वट करुन दिली आहे.

सदानंद कदम यांना यापूर्वी मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीचे समन्स बजावले होते. गेल्या जूनमध्ये अनिल परब यांची सहा तासांपासून ते 10 तासांपर्यंत तीन दिवस चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात रिसॉर्टच्या बांधकामात कोस्टल रेग्युलेशन झोनच्या तरतुदींच्या कथित उल्लंघनाशी संबंधित मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले होते.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. परब यांनी फसवणूक करून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नगर दापोली तालुक्यात एक आलिशान रिसॉर्ट बांधल्याचे सोमय्या यांनी आरोपी केले होते. सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, अनिल परब यांनी 2017 मध्ये हा भूखंड खरेदी केला होता आणि कोरोनाच्या काळात या शेतजमिनीवर रिसॉर्ट बांधण्याचे काम करण्यात आले होते.

Anil Parab's Resort
Sanjay Raut : नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता ? ; राऊतांनी डिवचलं

परबांना १४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. पर्यावरण मंत्रालय, भारत सरकारने CRZ मध्ये बांधकाम केल्याप्रकरणी कोर्टात तक्रार दाखल केली होती. तो वेगळा खटला दापोली न्यायालयात सुरू आहे. दापोली तालुक्यातील मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणी ही सुनावणी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com