Saif Ali Khan Attacked : सैफच्या घरात आरोपी कसा शिरला, काय होता उद्देश? पोलिसांना लागला सुगावा...

Mumbai Police Bollywood actor attack news Mumbai crime updates : अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
Saif Ali Khan
Saif Ali KhanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत महत्वाची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सैफच्या घरात घुसणारी व्यक्ती ही चोरच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तो जिन्यातूनच सैफच्या घरापर्यंत पोहचल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक आरोपी जिन्याचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात शिरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या आरोपीची मिळाली आहे. त्याला अटक करण्यासाठी दहा टीम कार्यरत असून लवकरच त्याला अटक केले जाईल. चोरीच्या उद्देशानेच तो घरात गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला अटक केल्यानंतर पुढील माहिती समोर येईल. आरोपीला अटक करण्याला सध्या प्राधान्य आहे.

Saif Ali Khan
MLA Rohit Pawar On Beed : राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन् गुंड असा आहे 'बीड पॅटर्न'

दरम्यान, सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरासोबत झालेल्या झटपटीत सैफवर धारदार शस्त्राने सहा वार झाले आहेत. त्याच्या मणक्यामध्ये एक वार खोलवर गेला असून तिथून चाकूचा एक तुकडाही काढण्यात आला आहे.

सैफच्या घरातील एका कामगार महिलेने सुरूवातीला चोराला पाहिले होते. त्यानंतर घरामध्ये गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या कामगार महिलेसह सुरक्षारक्षक व इतर काही घरातील कामगारांची चौकशी केली आहे. तसेच पोलिसांना चोरट्याचा मागमूस लागला असून लवकरच त्याला अटक केली जाऊ शकते.

Saif Ali Khan
Manikrao Kokate News : दादांना जे कळतं ते कुणालाच कळत नाही..! शरद पवारांसमोरच माणिकराव कोकाटेंनी साधली संधी

फायर एस्केपचा वार

आरोपीने सैफ राहत असलेल्या इमारतीतून पळून जाण्यासाठी फायर एस्केपचा वापर केल्याचे समजते. आपत्कालीन स्थितीमध्ये इमारतीत बाहेर पडण्यासाठी फायर एस्केपचा वापर केला जातो. तिथूनच चोराने सैफवर हल्ला केल्यानंतर पोबारा केल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com