Shiv Sena : सत्तर वर्षांत काय मिळालं, तर आठ चित्ते व गुंगी; शिवसेनेचा केंद्र सरकारला रोखठोक सवाल

Shiv Sena : मोदींच्या वाढदिवशी पुन्हा एकदा हिंदुस्थानात दाखल झाल्याने ‘भाजप’ नामक राजकीय पक्षाने काय मोठा उत्सव साजरा केला?
 chitaah latest news
chitaah latest newssarkarnama

मुंबई : देशात चित्ता नामशेष झाल्यानंतर नामिबियातून आठ चित्ते मागवण्यात आले आहेत. त्यात पाच माद्या आणि तीन नर आहेत. या आठ चित्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या 'रोखठोक'मधून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. (Shiv Sena latest news)

‘नामिबियातील आठ चित्ते हिंदुस्थानातील स्वर्गात आले आहेत. त्यांच्यासाठी नवा स्वर्ग निर्माण करण्यात आला आहे. लोक त्या स्वर्गात दंग आणि गुंग झाले. हीच आपली लोकशाही! जनतेला सत्तर वर्षांत काय मिळालं, तर आठ चित्ते व गुंगी! प्रत्येकाचा स्वर्ग आणि गुंगीची मात्रा वेगळी आहे. हिटलर, पुतीन, स्टॅलिन आणि आपण सगळे नक्की कोणत्या स्वर्गात विहार करीत आहोत हा संशोधनाचाच विषय आहे,’ असा शब्दात 'रोखठोक' मधून टीका करण्यात आली आहे.

काय म्हटलं 'सामना'च्या 'रोखठोक'मध्ये..

आठ चित्ते व त्यांना जंगलात सोडणारे आपले पंतप्रधान यांचे दर्शन सर्व वृत्तवाहिन्यांवर पुढचे 72 तास घडत होते. आठ चित्ते आले यापेक्षा दुसरी कोणतीच घडामोड त्यांना दिसत नव्हती. परदेशात दडवलेला 72 लाख कोटी काळा पैसा पेटारे भरून आणला असता तर देश अधिक आनंदी झाला असता. चित्ते आणले हा आनंदच आहे, पण आनंदाचा अतिरेक तरी किती करावा? त्यास काही मर्यादा? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाला आठ चित्ते मिळाले व त्याबद्दल तेव्हाच्या सत्ताधारी पक्षाने आनंदाचा उत्सव साजरा केला याची नोंद इतिहासात जरूर व्हायला हवी.

‘सुमारे सत्तर वर्षांपासून आपल्या देशातून बरेच काही नामशेष झाले. गेल्या काही वर्षांत तर सत्य आणि अहिंसादेखील नामशेष झाल्यासारखे वाटते. न्याय तर दिवा घेऊन शोधावा लागतो. सत्तर वर्षांपासून काय काय नामशेष झाले ते सर्व मिळवून देण्याच्या बोलीवर मोदी व त्यांचा पक्ष सत्तेवर आला, पण सुमारे 70 वर्षांपूर्वी हिंदुस्थानातून नामशेष झालेले चित्ते पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी पुन्हा एकदा हिंदुस्थानात दाखल झाल्याने ‘भाजप’ नामक राजकीय पक्षाने काय मोठा उत्सव साजरा केला? हे चित्ते ‘नामिबिया’ नामक आफ्रिकी देशाने दिले, पण भाजपच्या काही लोकांनी असे वातावरण तयार केले की, हे आठ चित्ते त्यांच्याच प्रयोगशाळेत ‘टेस्ट टय़ूब’द्वारे जन्मास घातले व पंतप्रधान मोदी यांनी ते मध्य प्रदेशच्या ‘कुनो’ राष्ट्रीय उद्यानात सोडले,’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com