Sambhajiraje Chhatrapati : शिवस्मारक शोधण्यासाठी निघालेल्या संभाजीराजेंना पोलिसांनी रोखलं; 'स्वराज्य'च्या कार्यकर्त्यांची धरपकड

Sambhajiraje Chhatrapati On Mahayuti Govt : गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण महाराष्ट्रात अजून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिला नाही? असा सवालही यावेळी संभाजीराजेंनी केंद्र आणि राज्य सरकारला केला.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 06 Oct : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचं आठ वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलं. मात्र, आतापर्यंत शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

त्यामुळे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वाखाली मोदींनी जलपूजन केलेल्या समुद्रातील शिवस्मारक शोधण्याची मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यासाठी ते मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात आपल्या कार्यकर्त्यांसह आले आहेत.

मात्र, यावेळी पोलिसांनी (Police) त्यांना समुद्रातील स्मारकाचं जलपूजन झालं त्या ठिकाणी जाऊ दिलं नाही. यावेळी पोलिसांनी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला.

तर पोलिसांना त्यांनी तुमची काय भूमिका आहे ते सांगा, मग आम्ही आमची भूमिका काय आहे ते सांगतो असं म्हणत संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांनाही पोलिस त्यांची भूमिका जाहीर करेपर्यंत शांत राहण्याचं आवाहन केलं.

Sambhajiraje Chhatrapati
Sharad Pawar Politics: निष्ठावंत आक्रमक; गद्दारांना प्रवेश टाळा, उमेदवारी तर नकोच!

यावेळी माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही कायदा हातात घेणार नाही. मात्र, ज्या स्मारकाचं उद्घाटन खुद्द देशाच्या पंतप्रधानाच्या (Narendra Modi) हस्ते झालं. त्या स्मारकाचं काय झालं. स्मारकाचा विषय महाराष्ट्रातील जनतेसमोर न्यायचा आहे.

मी चुकतोय असं सरकारने सांगितलं तर मी इथून मागे जाईन पण, मी अजिबात चुकीचं करत नाही. मी प्रामाणिक भावनेने इथे आलो आहे. शिवाय मी राजकारण करत नाही. कारण स्वराज्य पक्ष आता स्थापन झाला आहे, पण मी याआधीपासून गड किल्ल्यांबाबतची भूमिका ठामपण घेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Sambhajiraje Chhatrapati
Maharashtra Assembly Election 2024 : एकनाथ शिंदेंचा युवा भिडू ठाकरेंची 'पेटती मशाल' हाती घेणार

मला तुलना करायची नाही पण, गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण महाराष्ट्रात अजून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिला नाही? असा सवालही यावेळी संभाजीराजेंनी केंद्र आणि राज्य सरकारला केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com