High Court on Sameer Wankhede Case: समीर वानखेडे प्रकरण: उच्च न्यायालयाने 'सीबीआय'ला फटकारलं...

Sameer Wankhede case: २८ जूनला पुढील सुनावणी होईल
Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama

Sameer Wankhede Case Update: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला वाचवण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी शाहरुखकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी ११ मे २०२३ रोजी एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने वानखेडे यांच्यासह इतर चार जणांविरोधातही एफआयआर दाखल केला. यामुळे वानखेडे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी (२२ जून) न्या. अजय गडकरी व न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ‘समीर वानखेडे यांना फौजदारी दंड संहितेच्या कलम ४१-अ अन्वये नोटीस बजावली असेल तर अटकेचा प्रश्न येतो कुठून. जर न्यायालयाने वानखेडेंना (Sameer Wankhede) अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे, तर सीबीआय ते संरक्षण काढण्याची मागणी का करत आहे, त्यांना अटक करण्याची स्थिती उद्भवली आहे का, सीबीआय न्यायालयाला या गोष्टी उघडपणे का सांगत का नाही?’, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले आहेत. याच वेळी सीबीआयने ‘लपवाछपवीचा खेळ थांबवावा’, अशा शब्दांत न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला फटकारलं आहे.

Sameer Wankhede
ED Raid Action On Jayant Patil : जयंत पाटील यांच्याशी संबंधित बँक 'ईडी'च्या रडारवर; 1 हजार कोटी वळते केल्याचा आरोप..

तसेच, तपासाची प्रगती दाखवण्यासाठी २८ जूनला पुढील सुनावणी होईल, त्यावेळी केस डायरी सादर करा, असे आदेशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.तसेच तोपर्यंत वानखेडे यांना पूर्वी दिलेले अंतरिम संरक्षण कायम असेल, असंही न्यायालयाने नमुद केलं आहे. (Sameer Wankhede -Aryan Khan Case)

दरम्यान, ‘अटकेची कारवाई करणे हा सीबीआयचा विशेषाधिकार आहे.' असा युक्तिवाद अॅड. कुलदीप पाटील यांनी सीबीआयच्या वतीने केला. त्यावर ‘अटक करण्याच्या निष्कर्षापर्यंत सीबीआय आली आहे का, तुम्हाला अशी कोणती कठोर कारवाई करायची आहे? न्यायालयात ते सांगण्याची भिती का वाटतेय ? हा लपवाछपवीचा खेळ थांबवा’, अशा शब्दातं न्यायालयाने अक्षरश: सीबीआय ला झापलं. तर सध्या हा तपास प्राथमिक टप्प्यावर असून अटक कारवाईच्या निष्कर्षापर्यंत सीबीआय आले नसल्याने सीबीआयतर्फे न्यायालयात सांगण्यात आले.आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जूनला होणार आहे. (Sameer Wankhede-CBI )

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com