ED Raid Action Sangli Bank : सांगलीतील बँक 'ईडी'च्या रडारवर; 1 हजार कोटी वळते केल्याचा आरोप..

Sangli News : बनावट कागपत्रांद्वारे खाती उघडल्याचा आरोप..
ED Action In Sangli :
ED Action In Sangli :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News : राजाराम सहकारी बँकेच्या (Rajaram Co-Operative Bank) कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रातही एकूण १४ ठिकाणी ईडीने छापेमारी केली. दहा वर्ष जुन्या एक हजार कोटी रूपयांच्या व्यवहारावर संशयास्पद व्यवहाराचा ईडीकडून तपास सुरू आहे. या अनुषंगाने ईडीने छापेमारी केली आहे. अशी बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

ED Action In Sangli :
BRS Entry in Maharashtra Politics : मोठी बातमी : BRS ने महाराष्ट्रात खातं उघडलं ; मराठवाड्यात..

बनावट कागदपत्रांच्या आधारे खाती उघडून रकमा रोख स्वरूपात वळत्या करण्यात आलेल्या आहेत, अशी तक्रार जीएसटी विभागाने ईडीकडे केली होती. या कथित घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सहभागी असल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात असणाऱ्या सीएच्या कार्यालयावरही ईडीने छापेमारी केली आहे.

ED Action In Sangli :
Ramdas Athawale On Opposition Meeting : विरोधकांनो कितीही बैठका घ्या, जिंकणार तर मोदीच; आठवलेंनी ठणकावलं!

या बँकेच्या मुख्य कार्यालयावर काल (दि.२३ जून) छापेमारी झाली. सांगलीमध्ये ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. दहा वर्ष जुनं हे प्रकरण आहे. या बँकेतून १ हजार कोटी रूपये वळते केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यामुळे बँकेचे अधिकारी आणि सांगलीतील काही व्यापारीही ईडीच्या रडारवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.