Sana Malik News : नवाब मलिक यांची कन्या सना मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी ; अजित पवारांनी केली घोषणा!

Ajit Pawar NCP and Sana Malik News : आता महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपची राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Ajit Pawar NCP and Sana Malik
Ajit Pawar NCP and Sana MalikSarkarnama
Published on
Updated on

NCP spokesperson Sana Malik : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावर नियुक्ती केली आहे. अजित पवार यांनी स्वत: या निवडीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपची राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सना नवाब मलिक यांना आमच्या पक्षाची प्रवक्ता म्हणून घोषित करत आहोत, असं उपमुख्यंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केल. तसेच महिलांना आणि तरुणांना संधी द्यायची आहे, म्हणूनच आम्ही सना नवाब मलिक यांना प्रवक्त म्हणून घोषित करत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

एवढच नाहीत सना मलिक यांचं इंग्लिश, हिंदी चांगलं आहे, मराठीही चांगलं होईल. त्यांना कसलीही गरज लागली तर आम्ही अगदी रात्री 12 वाजता सुद्धा त्यांच्या पाठीशी आहोत, असंही यावेळी अजित पवारांनी(Ajit Pawar) स्पष्ट केलं.

Ajit Pawar NCP and Sana Malik
Nawab Malik: अखेर ठरलं! नवाब मलिक 'साहेब' की 'दादां'सोबत? टि्वटवरुन दिलं उत्तर

विरोधकांनीही अल्पसंख्यांकांबाबत अनेक खोट्या गोष्टी बोलल्या. कुठेतरी सीएए, एनआरसी बद्दलही बोललं गेलं. पण ते फक्त त्या भारतीयांसाठी होते जे परदेशात समस्यांना तोंड देत आहेत. वक्फ बोर्डाच्या बाबतीत अल्पसंख्याकांवर अन्याय होत असेल तर ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. आणि हे फक्त अल्पसंख्याकांचे नाही, कोणत्याही समाजावर अन्याय होत असला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar NCP and Sana Malik
Zeeshan Siddique and Ajit Pawar : काँग्रेसपासून लांब... लांब... झिशान सिद्दीकींना अजितदादांचा गुलाबी रंग भावला अन् जनसन्मान रॅलीत उतरले

याशिवाय, विरोधक म्हणतात की लाडकी बहीण योजना ही निवडणूक घोषणा आहे. पण तसं काही नाही, मी गेली 35 वर्षे जनतेची सेवा करतोय. ही लाडकी बहीण योजना मी आणली पण बजेटचा प्रश्न होता. पण लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. विरोधकांनी यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. पैसे कुठून येणार, मग न्यायालयात गेले. मग म्हणाले की हे सरकार पैसे देणार नाही.

पण न्यायालयाने म्हटले की, कोणतेही सरकार यासाठी योजना आणू शकते. लोकसभेत विरोधकांनीही बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्याचे सांगितले पण तसे काही नाही, मी आधीच सांगितले होते की जोपर्यंत सूर्य,चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान कायम राहील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com